Pune news : पुण्याच्या वस्तीगृहात घुमले 'ओ रे बंदूक वाले'चे सूर; गाण्यावरचा तो डान्स अन् थेट गुप्तचर यंत्रणांची एन्ट्री! नक्की काय घडलं?

Pune students dance incident investigation | पुण्यातील वसतिगृहात ‘ओ रे बंदूक वाले’ गाण्यावर झालेल्या डान्सनंतर गुप्तचर यंत्रणांची एन्ट्री झाली. या घटनेमागचं खरं कारण आणि संपूर्ण घडामोडी जाणून घ्या.
Pune news : पुण्याच्या वस्तीगृहात घुमले 'ओ रे बंदूक वाले'चे सूर; गाण्यावरचा तो डान्स अन् थेट गुप्तचर यंत्रणांची एन्ट्री! नक्की काय घडलं?
Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील एका वस्तीगृहामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये सादर करण्यात आलेल्या गाण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हे गाणं माओवाद्यांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.

विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात एका गटाने “ओ रे बंदूक वाले” या गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यात माओवादी कमांडर मांडवी हिडमा याचे कथित गौरवगान असल्याच्या आरोपांमुळे प्रकरण चर्चेत आले आहे.

Pune news : पुण्याच्या वस्तीगृहात घुमले 'ओ रे बंदूक वाले'चे सूर; गाण्यावरचा तो डान्स अन् थेट गुप्तचर यंत्रणांची एन्ट्री! नक्की काय घडलं?
ED raid : ममता बॅनर्जींंना सत्तेत पोहचवणाऱ्या 'पडद्यामागच्या' कलाकारालाच उचललं : मतदानापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये 'ईडी'ची मोठी कारवाई

समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले की, क्रॉस इन्व्हेस्टिगेशन आणि पोलिसांसोबत केलेल्या तपासानुसार विद्यार्थ्यांनी हे गाणे अनवधानाने निवडले होते. कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक हेतूने आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विविध भागातील पारंपरिक पोशाख घालून नृत्य सादर करण्याची कल्पना केली होती. त्यांनी यूट्यूबवर गाणी शोधली आणि फक्त संगीत आवडल्यामुळे हे गाणे निवडले. गाण्याच्या आशयाची सखोल माहिती त्यांना नव्हती.

या कार्यक्रमासाठी कोणतीही पूर्वतयारी नव्हती. अवघ्या दहा मिनिटांत हे नृत्य ठरवण्यात आले होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी स्वतःहून आयोजित केला होता आणि त्यासाठी अधिकृत परवानगी घेतली नव्हती. वसतिगृहात सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता आहे. सध्या परीक्षेनंतर ६०० ते ७०० विद्यार्थी उपस्थित आहेत. त्यापैकी ८५ टक्के विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील तर १५ टक्के इतर समाजातील आहेत.

घटनेची दखल घेत पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून या प्रकाराचे गांभीर्य समजावून सांगितले. पुन्हा अशा चुकांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, “सेव ट्री” अर्थात झाडे वाचवा या संकल्पनेने हे गाणे निवडले होते. झाडांच्या बाबतीत हिडमा यांचे काम चांगले असल्याचे त्यांचे मत होते. मात्र, गाण्यातील माओवादी संदर्भाबाबत त्यांना पुरेशी जाणीव नव्हती.

Pune news : पुण्याच्या वस्तीगृहात घुमले 'ओ रे बंदूक वाले'चे सूर; गाण्यावरचा तो डान्स अन् थेट गुप्तचर यंत्रणांची एन्ट्री! नक्की काय घडलं?
Zilla Parishad news : जिल्हा परिषद पंचायत समिती मधील पराभूत नेत्यांनच्या बॅकडोअर एंट्रीला ब्रेक; राज्यपालांची स्वाक्षरीच नाही

प्रशासनाने या प्रकाराला राजकीय किंवा माओवादी आशय न देता केवळ अनवधानाची चूक म्हणून पाहिले आहे. तरीही पोलिसांनी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांविषयी माहिती गोळा केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com