

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच 'ईडी' ने मोठी कारवाई करत राजकीय सल्लागार संस्था ‘इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी’ म्हणजेच I-PAC चे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना दिल्लीतून अटक केली आहे. निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
I-PAC ही संस्था मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या निवडणूक रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होती. याच संस्थेच्या कोलकाता येथील कार्यालयावर जानेवारी महिन्यात छापेमारी झाली होती. त्या वेळी स्वतः ममता बॅनर्जी घटनास्थळी पोहोचल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
विनेश चंदेल हे I-PAC चे प्रमुख चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. प्रशांत किशोर, प्रतीक जैन आणि ऋषिराज सिंह यांच्या सोबत त्यांनी ही संस्था उभी केली होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
ईडीच्या माहितीनुसार, विनेश चंदेल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई PMLA कायद्यांतर्गत करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील चर्चित कोळसा घोटाळ्याशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप आहे. कोळसा चोरी आणि तस्करीतून मिळालेला काळा पैसा हवाला मार्गाने I-PAC च्या खात्यांमध्ये पोहोचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या आधी 2 एप्रिल रोजी दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबई येथेही ईडीने छापे टाकले होते. दिल्लीतील चंदेल यांच्या ठिकाणासोबतच बेंगळुरूमध्ये ऋषिराज सिंह यांच्या ठिकाणी आणि मुंबईत विजय नायर यांच्या परिसरातही तपास करण्यात आला होता. तसेच 8 जानेवारीला कोलकात्यात I-PAC कार्यालय आणि प्रतीक जैन यांच्या घरावर छापेमारी झाली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अटकेमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.