Pune Lok Sabha Constituency : पुणेकरांचे प्रश्न प्राधान्याने मांडणारे जगदीश मुळीक

Pune Political News : जगदीश मुळीक हे साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ भाजपचे पुणे शहराध्यक्ष होते.
Jagdish Mulik
Jagdish MulikSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत जडणघडण झालेल्या जगदीश मुळीक यांना 2014 च्या विधानसभेसाठी भाजपकडून वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली अन् ते विजयी झाले. त्यानंतरच्या काळात त्यांनी भाजपचे संघटनात्मक काम करताना पक्षवाढीसाठी प्रयत्न केले.

राज्यात मधल्या अडीच वर्षांच्या काळात भाजपकडे सत्ता नसताना त्यांनी पुण्यासारख्या शहरी भागात असंख्य कार्यकर्ते पक्षाशी जोडून ठेवण्याचे काम केले. पुणे शहरातील प्रत्येक मतदारसंघात कार्यक्रम आणि पक्षाची ध्येयधोरणे राबवत त्यांनी कार्यकर्त्यांशी घट्ट नाते निर्माण केले. केंद्रातील मोदी सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सचोटीने केले आहे.

जगदीश मुळीक हे साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ भाजपचे पुणे शहराध्यक्ष होते. कोरोनाकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचे आव्हान त्यांनी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने लीलया पार करीत भरीव काम केले. पुणे शहराला आरोग्यसंपन्न ठेवण्याचा संकल्प करीत त्यांनी जगदीश मुळीक फाउंडेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. भाजपकडे युवाशक्तीला खेचून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

संघटना मजबूत करतानाच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा, आत्मविश्वास देण्याचा आणि त्यांच्या संघर्षाला साथ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत केला. या कालावधीत त्यांनी पुणेकरांचे प्रश्न प्राधान्याने मांडण्याचा, ते सोडवण्याचा प्रयत्न केला. 2027 पर्यंत पुणे शहर भारतातील सर्वात स्वच्छ करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. वडगावशेरी मतदारसंघात कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर भागाचा समावेश आहे. त्याचा त्यांना फायदा झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jagdish Mulik
Nandurbar Lok Sabha Constituency: डॉ. हिना गावितांसाठी घराणेशाहीचा मुद्दा ठरणार अडचणीचा...!

नाव (Name) :

जगदीश तुकाराम मुळीक

जन्मतारीख (Birth Date) :

1 एप्रिल 1981

शिक्षण (Education) :

बीए

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

जगदीश मुळीक यांचे वडील तुकाराम मुळीक हे विश्व हिंदू परिषदेत कार्यरत होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि बांधकाम व्यवसाय आहे. 1996 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या मातोश्रींचे नाव छाया आहे. त्यांच्या पत्नीचे नाव मेघा आहे. त्यांचे भाऊ योगेश मुळीक दोनवेळा पुण्याचे नगरसेवक राहिले आहेत. त्यासोबतच एकवेळा ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांचे दुसरे भाऊ विशाल मुळीक बांधकाम व्यवसाय सांभाळतात.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business):

शेती आणि बांधकाम व्यवसाय.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (LokSabha Constituency) :

पुणे

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation) :

भाजप

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey) :

सुरुवातीच्या काळात जगदीश मुळीक भाजप विद्यार्थी आघाडीत सक्रिय होते. 2002 मध्ये भाजप विद्यार्थी आघाडीचे सरचिटणीस, 2005 मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. 2007 मध्ये ते पुणे महापालिका वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य होते. 2008 मध्ये युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते.

2011 मध्ये भाजप पुणे शहर चिटणीस, 2013 मध्ये सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली होती. 2014 मध्ये ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना वडगाव शेरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्याकडून 4,961 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2020 मध्ये ते भाजपचे पुणे शहराध्यक्ष बनले.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 LokSabha Election) :

2019 ची निवडणूक त्यांनी लढवली नव्हती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

त्यांनी निवडणूक लढवली नव्हती.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency) :

जगदीश मुळीक हे नेहमीच विविध सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. त्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर त्यांचा भर असतो. जगदीश मुळीक फाउंडेशनच्यावतीने त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. पुणे ते वाघोलीपर्यंत मेट्रोसाठी ते प्रयत्नशील होते. पुणे शहर व उपनगरांमध्ये विविध ठिकाणी उड्डाणपूलनिर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. 24 तास पाणीपुरवठा योजना, पुणे शहराच्या विकासाच्या विविध योजनांसाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पुणे शहर अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सर्वस्पर्शी काम केले आहे. कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम करण्यास पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे शहरात पक्षाची भूमिका प्रभावीपणे राबवली. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना पक्ष सघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत पोचविल्या

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नसतानाही तेथील विकासकामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ते नियमित बैठका घेतात. मतदारसंघातील विकासकामांचा ते नियमित आढावा घेतात. कामानिमित्ताने त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांची नेहमीच गर्दी असते. वडगाव शेरी मतदारसंघातील बहुतांश ज्येष्ठ कार्यकर्त्यांना व युवा मंडळींना ते त्यांच्या नावानिशी ओळखतात. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल : (Social Media Handles) :

जगदीश मुळीक हे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करताना दिसून येतात. पक्षाची ध्येयधोरणे, मतदारसंघात केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, कू ॲप, नमो ॲप, सरल ॲप, यू-ट्यूब चॅनेलचा वापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवावर्ग मोठ्या संख्येने त्यांच्याशी जोडला गेला आहे. पक्षाची ध्येयधोरणे, भाषणे, मेळावे याची माहिती ते सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवरून कार्यकर्त्यांना देत असतात. पुणे शहरातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली जातात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

पुणे शहरातील वाहतूककोंडीच्या प्रश्नासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्या भेटीनंतर जगदीश मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्यातील वाहतूककोंडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पुणेकरांसाठी लस उपलब्ध करून देताना राज्य सरकारने दुजाभाव केला तरी पुणे महापालिका पुणेकरांसठी लस उपलब्ध करून देईल. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक तयारी करण्यात येणार असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru) :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकारात्मक मुद्दे : (Positive Points about candidate) :

मुळीक यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य, दमदार वक्तृत्वशैली, विकासाचे धोरण, जनतेमध्ये मिसळून काम करणे आणि युवावर्गाची ताकद आहे. भाजपमध्ये युवाशक्तीला खेचून आणण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे त्यांची नागरिकांत चांगली ओळख आहे.

मतदारसंघातील कामांसोबातच भामा-आसखेड प्रकल्प, विविध विषयांवर विधानसभेत आवाज उठवला, मतदारसंघात अनेक ठिकाणी ओपन जिम बसवल्या, इतर पक्षातील अनेक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेतले. लोहगाव येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे असून, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपुलांची उभारणी, इतर ठिकाणचे उड्डाणपूल व नदीवरील पुलांच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची राज्यशासनामार्फत उभारणी, मतदारसंघात वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक प्रमुख कामे त्यांनी पूर्ण केली. वडगाव शेरी मतदारसंघासाठी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. उद्यानांची निर्मिती विमानतळ विकास, पुणे ते वाघोलीपर्यंत मेट्रो, पुणे शहर व उपनगरांमध्ये विविध ठिकाणी उड्डाणपूलनिर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला.

Jagdish Mulik
Chandrakant Patil : 'स्वच्छतेची अनुभूती का घ्यावी', चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण!

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळेस लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करावी लागणार आहे. येत्या काळात महायुतीमधील सर्व घटकपक्ष व पक्षांतर्गत विरोधक अशी मोट बांधावी लागणार आहे. त्याशिवाय केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत. पुणे शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतोय, या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest LokSabha election what will be the consequences) :

भाजपकडे पुणे लोकसभा मतदारसंघात त्यांच्याशिवाय चार ते पाच तुल्यबळ उमेदवार सध्या तरी दिसत आहेत. ते दोनवेळा नगरसेवक झाले. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून ते एकदा विजयी झाले. भाजपचे पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांचे स्वतःचे मोठे नेटवर्क आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावर ते मतदारांना सामोरे जाऊ शकतात. त्याशिवाय संपूर्ण पुणे शहराची त्यांना माहिती आहे. उमेदवारी मिळाली नाही, तर जगदीश मुळीक पक्षाविरोधात बंडखोरी करतील, अशी शक्यता नाही. ते पुन्हा विधानसभेची निवडणूक लढू शकतात.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Jagdish Mulik
Nashik Politics : पक्षातील 'इनकमिंग'मुळे डोकेदुखी वाढली ? तीन महिला आमदारांसमोर विरोधकांसह स्वपक्षाचेही आव्हान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com