Nashik News: नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि देवळाली विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला आमदारांसमोर विरोधकांसह स्वकीयांचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषत: भाजपमध्ये इच्छुकांची होणारी इनकमिंग पक्षाला फायदेशीर असली तरी दोन टर्म आमदार राहिलेल्या आमदारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या शहरातील विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे सीमा हिरे आणि देवयानी फरांदे प्रतिनिधित्व करतात. दोन टर्म आमदार म्हणून कार्यरत असलेल्या आमदारांना मंत्रिपदापर्यंत पोहचता आले नाही. तसेच यावेळी अँण्टी इन्कम्बसीचाही धोकाही आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण समोर आले. यावेळी ‘बडी भाभी’ या वाक्यामुळे आमदार फरांदे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांच्यातील वाद बराच गाजला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या आमदाराचे नाव विरोधकांनी ड्रग्ज माफीयांशी जोडले. या घडामोडीचा पक्षावर मोठा परिणाम झाल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. भाजपच्या सीमा हिरे यांच्यासमोर नुकत्याच पक्षात आलेल्या सोनाली राजे पवार आणि अश्विनी बोरस्ते आव्हान निर्माण करू शकतात. अश्विनी बोरस्ते काँग्रेसच्या गटातून भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत.
त्या पश्चिमसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर, मागच्या पंचवार्षींकला सोनाली पवार यांनी पूर्ण ताकद लावलीच नव्हती. यंदा पवार आणि बोरस्ते भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. देवळाली मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सरोज अहिरे या आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करतात.
आज मितीस स्वपक्षातून त्यांना खास असा विरोधक नसला तरी मित्र पक्ष भाजपने माजी तहसीलदार डॉ.राजश्री अहिरराव यांना पक्षात प्रवेश दिला आहे. विधानसभेसाठी मागील पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या अहिरराव यंदा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जातो अन् कोणाची लॉटरी लागते, हा प्रश्न गुलदस्त्यात असला तरी सरोज अहिरे यांच्यासमोर अहिरराव यांचे आव्हान असणार हे निश्चित!
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.