

Pune Jain Boarding House Land : पुण्यातील जैन बोर्डिंग बाबत मोठी बातमी समोर येत आहे. धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगचे 230 कोटी रुपये गोठवले आहे. पुढील कार्यवाही होण्यापूर्वी ट्रस्टींना 230 कोटी रुपये काढता येणार नाही, असा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग वाद सध्या चर्चेचा बनला आहे. जैन बोर्डिंग जमिन व्यवहार प्रकरणानंतर जैन समुदाय संतप्त झाला आहे. दरम्यान जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांच्यासोबत विशाल गोखले यांनी जमिनीचा व्यवहार रद्द केला आहे. याबाबतचा ई-मेल त्यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टींना पाठवला आहे. धर्मादाय आयुक्तालय यांना ईमेल पाठवण्यात आला आहे. पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे ई -मेलमध्ये नमूद केले आहे.
काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला स्थगिती दिली होती. गोखले बिल्डर्सकडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देण्यात आले होते.हे पैसे लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये केली आहे. त्यानंतर आता धर्मादाय आयुक्तांनी हे 230 कोटी रुपये गोठवले आहेत.
या प्रकरणी जैन मुनींनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जैन बोर्डिंग या जमिन व्यवहारात राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवेसनेचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर या मुद्यांवरुन रस्यावर उतरले आहेत. आज ते जैन बोर्डिंग भेट देणार असून विश्वस्तांशी संवाद साधणार आहेत. जागेची बेकायदेशीरपणे विक्री किंवा गहाण दाखवण्यात आली असल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे. आता बिल्डर कंपनी गोखले लँडमार्क्स LLP या व्यवहारातून मागे हटली असून त्यांनी व्यवहार रद्द करीत असल्याचा मेल ट्रस्टला पाठवला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट दिली. जैन मुनींची भेट घेऊन आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे मोहोळ यांनी त्यांना सांगितले. जैन समाजाला न्याय मिळेल, असे आश्वासन मोहोळ यांनी दिले.
पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये ‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग ट्रस्ट’ या धर्मादाय संस्थेचे ‘जैन बोर्डिंग’आहे.
ज्या विकसकाने ही जागा विकासासाठी घेतली, तो बांधकाम व्यावसायिक एका राजकीय नेत्याचा भागीदार आहे.
काही विश्वस्तांनी जमीन विकताना आवश्यक परवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता व्यवहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात आता धर्मादाय आयुक्तांनी ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे.
हा व्यवहार रद्द करावा, अशी ‘बोर्डिंग बचाव कृती समिती’ची मागणी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.