Pune PMC master plan : पुणे आता ठरणार 'लेक सिटी'; पाषाण आणि कात्रज तलावांसाठी महापालिकेचा 'मास्टर प्लॅन' काय?

Pune lake city project details : पुणे महानगरपालिकेचा पाषाण आणि कात्रज तलाव विकासासाठी मोठा मास्टर प्लॅन. पुणे खरंच ‘लेक सिटी’ होणार ? सविस्तर वाचा.
Pune Lake City Plan
Pune Lake City PlanSarkarnama
Published on
Updated on

Katraj Lake Development: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात पर्यावरण संवर्धनासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यावर भर देण्यात आला आहे.

शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिली अत्याधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने मोजला जाईल आणि प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.

Pune Lake City Plan
Ashok Kharat Case : केवळ लैंगिक शोषणच नाही, तर त्यापुढेही खरातचा अघोरीपणा; 'त्या' कृत्यांची हादरवणारी माहिती समोर

पुण्याला ‘लेक सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पाषाण, मॉडेल कॉलनी आणि जांभुळवाडी येथील तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तलाव परिसरात पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि नागरिकांसाठी आकर्षक सार्वजनिक जागा तयार केल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात मांगडेवाडी, कात्रज, धायरी आणि लोहगाव परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येईल.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी नदी संवर्धन महोत्सव, संवाद-परिषदा, प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच शहरातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी राज्य वन विभागाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यात संरक्षक भिंती, वृक्षारोपण, पाणीसाठा आणि सुरक्षाव्यवस्था यांचा समावेश असेल.

Pune Lake City Plan
Pune Property Tax : 'गोलमाल है भाई सब गोलमाल है!' 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना कर माफी, पण 'या' एका अटीमुळे सर्वसामान्यांचे टेन्शन वाढणार!

पुणे महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून एका वर्षात ५० लाख झाडे लावण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच ‘शहरी जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत वेताळ टेकडी, पाचगाव पर्वती, वारजे, गंगाधाम, हडपसर, धानोरी आदी भागांमध्ये पाणी साठवण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या जातील.

या उपक्रमांमुळे पुणेकरांना स्वच्छ हवा, हरित परिसर आणि पर्यावरणपूरक जीवनमान मिळेल. तलाव सुशोभीकरण आणि वृक्षलागवडीमुळे शहरातील तापमान नियंत्रित राहील, जैवविविधतेला चालना मिळेल आणि जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल असा दावा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com