Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेनंतर पुण्यातील 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड कोणाला ठरणार फायदेशीर?

Pune Lok Sabha Constituency : पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (13 मे) रोजी मतदान होत आहे
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहत राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. गेल्या महिन्यात मुंबई येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला.

पुणे लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून लढणारे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी दोन दिवसापूर्वी पुण्यात जाहीर सभा देखील घेतली. पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचितकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून अनिस सुंडके हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत.

महायुतीकडून निवडणूक लढणारे मोहोळ यांच्या पाठिशी उभे राहा असे आदेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडली; मुरलीधर मोहोळांना खासदारकी मिळवण्याआधीच करुन दिली 'ही' जाणीव !

पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या (सोमवारी) 13 मे रोजी मतदान होत आहे. जाहीर प्रचाराची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे आता उमेदवार आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रचारावर भर न देता नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपला प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील मोठ्या सोसायटी तसेच ज्या भागात आपले हक्काचे मतदान आहे तेथील नागरिकांच्या बैठका घेत त्यांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे नियोजन महायुती तसेच महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनंतर विधानसभा निहाय अध्यक्ष तसेच महत्त्वाचे पदाधिकारी यांची बैठक रविवारी सकाळी पार पडली. यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) यांना आपल्या भागातून अधिकाधिक मताधिक्य कसे देता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचे मनसेच्या शहरातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

Raj Thackeray
Raj Thackeray News : पावसानंतरही राज ठाकरेंनी सभा गाजवली; तडाखेबंद भाषणातील '११' मुद्दे

मोहोळ यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी फतवे काढले जात असल्याचा मुद्दा मांडला होता. अशाप्रकारे जर का फतवे काढले जात असेल तर मी देखील तुम्हाला आदेश देतो की महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन त्यांनी जाहीर सभेत हिंदू मतदारांना केले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आता सोशल मीडियावर मात्र 'आमचं ठरलय' हा ट्रेंड सुरू झाला आहे. 'जय श्रीराम आमचं ठरलंय' असे लिहिलेले पोस्टर सध्या चांगलंच व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये वाक्यांच्या मागे अयोध्येतील राम मंदिर आणि ज्ञानवापीतील मंदिराचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. शहरातील मनसेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्याकडून हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात असल्याचे दिसून येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com