Pune Political News : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. त्यातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र कुणीही शहराच्या विकासाबाबत बोलत नाहीत. यापासून लक्ष हटवण्यासाठी नेते जातीपातीचे राजकारण करतात. त्याला बळी न पडता, विकासाला मत देण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले. तसेच भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळांना पुण्याच्या समस्यांची जाणीवही करून दिली.
पुण्यात मोहोळाच्या Mulidhar Mohol प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरेंनी पुण्याची स्थिती नेमकी कशी झाली आहे, आणि कशी हवी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, नियोजन नसेल तर शहर बरबाद होतात. मुंबई शहर बरबाद होण्यास एक काळ लागला. पण पुण्याची वाट लागण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती ठाकरेंनी व्यक्त केली.
पुणे मनपाची लोकसंख्या पाच दहा वर्षांपूर्वी 30 ते 35 लाख होती. आता ती 70 लाख झाली आहे. तर या शहरात वाहनांची संख्या मात्र 72 लाख आहेत. या वाहनांसाठी कुठून आणायचे रस्ते? सध्या सार्वजनिक बस आहे, त्यातच मेट्रो सुरू झाली आहे. मात्र येथील लोकांची मानसिकता वेगळी आहे. त्यासाठी सार्वजनिक दळणवळण सुधारण्याची गरज असल्याचे ठाकरेंनी Raj Thackeray सांगितले.
शहरात लोकसंख्येच्या अनुषंगाने15 टक्के रस्ते असावेत. पुण्यात मात्र आठ टक्केच रस्ते आहे. शिक्षण, नोकरी, व्यावसाय आदी विविध कारणांसाठी गेल्या दहा वर्षांत 30 लाख लोक बाहेरून आले आहेत. त्यांच्या काय गरजा आहेत, या पाहून सुविधांची पूर्तता करणे गरजेचे आहे. पुण्यात सुमारे पाच लाख लहानमोठे व्यवसाय आहेत. त्यातून दिल्लीला 80 ते 85 हजार कोटी कर भरला जातो. मात्र त्यांच्या समस्यांकडे पाहायला कुणाला लक्ष नाही. त्यांच्यासाठी कधीही सर्व विभागांची एकत्रित बैठक झालेली नाही, याकडे ठाकरेंनी लक्ष वेधले.
पुण्यात नदी सुधार प्रकल्प राबवला गेला. याबाबत मात्र मनपाला काही कल्पना नाही. केंद्रातून निधी येतो, त्यांचे ते काही तरी उपक्रम राबवतात, त्याबाबत मनपाला काही देणे घेणे नसते. शहरातील विकास कामांबाबत एकत्रित बैठका घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे असते. आता मात्र कुणाचा कुणाला मेळ नसतो, त्यामुळे नियोजित शहर होणार नाही, असेही ठाकेरंनी ठणकावून सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लहान असल्यापासून पुण्यात Pune येत आहे. त्यावेळी येथील वातावरण छान होते. आता तेच पुणे कुठून कुठपर्यंत पोहचले याचा आंदाजच येत नाही. त्यासाठी नियोजन करणे गरजचे आहे. राज्यातील अनेक शहरे अस्ताव्यस्तपणे वाढत आहेत. त्यावरून लक्ष दूर करण्यासाठी विरोधक धार्मिक मुद्दे काढतात. त्याकडे मात्र लक्ष देऊ नये, आणि विकासाला मत द्यावे, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.