Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ला काँग्रेसचा उमेदवार ठरणार अन् नावही जाहीर होणार

Pune Lok Sabha Constituency Nana Patole Says : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार ठरला?
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Constituency Politics News :

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्याबाबत साचेबद्ध कार्यक्रम देखील काँग्रेसने आखला आहे. त्यानुसार आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर करण्याची तारीखही सांगितली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेससह मित्र पक्षांनी कंबर कसली आहे. त्यानुसार विभाग निहाय बैठका काँग्रेसकडून घेण्यात येत आहेत. आज देखील अशाच पद्धतीची पश्चिम महाराष्ट्राचे बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील Lok Sabha Election 2024 च्या जागा जिंकण्यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीची चाचणी करण्यात आली. तसेच संभाव्य उमेदवारांबाबत देखील चर्चा झाली.

Nana Patole
Maratha Reservation : जरांगे जर मुंबईत पोचले, तर महाराष्ट्राचे मणिपूर करणार का?; नाना पटोले यांचा सरकारला सवाल

पुणे काँग्रेस शहराध्यक्षांनी यापूर्वीच पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वीसजणांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व नावांची राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्य पातळीवरती चर्चा करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरती सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्या सर्वेक्षणाच्या आधारेच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटवले यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

नाना पटोले यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत मोठी माहिती दिली. पुण्यातील उमेदवाराबाबत पक्ष पातळीवरती सर्वेक्षण सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर देखील उमेदवारी बाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. नुकतीच प्रदेश पातळीवर देखील सर्वेक्षणात सुरुवात करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर लगेच काँग्रेसकडून निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडून अधिकृतरित्या त्यांच्या नावाची चर्चा झालेली नाही. काँग्रेसकडून वारंवार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी एक सक्षम उमेदवार दिला जाईल एवढेच विधान करण्यात येत आहे.

दरम्यानच्या कालावधीमध्ये धंगेकर यांनी दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती. आणि त्यानंतर शहरात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र, ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वेळीही चर्चेत असलेल्या नावांपेक्षा वेगळे नाव ऐनवेळी देण्यात आले होते.

Nana Patole
Ravindra Dhangekar : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना भाजपची ऑफर? ; 'या' नेत्याच्या विधानाने जोरदार चर्चा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com