Lok Sabha Election 2024 : पुणे मतदारसंघातील विजयाची भाजपची रणनीती ठरली! बावनकुळेंनी दिली मोठी माहिती

Pune Lok Sabha Constituency Chandrashekhar Bawankule Reaction : पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीबाबत मोठी माहिती दिली...
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुणे लोकसभा मतदारसंघात आमचा विजय होईल. 51 टक्के मते घेऊन महायुती जिंकेल. गेल्या वेळेपेक्षाही मोठा विजय पुण्यात होईल, अशी योजना आम्ही तयार केली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात दिली.

घर चलो अभियानात साडेतीन लाख नागरिकांच्या घरी जातोय. सहाशे प्रमुख पदाधिकारी मोदींच्या कार्यकाळातील सर्व योजना गरीब कल्याण, मध्यमवर्गीयांचे कल्याण, विविध उपक्रम, विकासाच्या योजना या सर्वांची माहिती घर चलो अभियानात दिली जाईल. तसेच आम्ही ज्यांच्याकडे जातो, त्यावेळी जनतेचे आम्हाला समर्थन मिळत आहे. Narendra Modi यांच्या नेतृत्वात विजय होईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.

Chandrashekhar Bawankule
Sunil Kamble Slap Police : पोलिसाला मारहाण करणे भाजप आमदारांना भोवले; सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल!

लोकसभा निवडणुकीसाठी कुठलाही उमेदवार ठरवण्याचा राज्यात कुणालाही अधिकार नाही. भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाला हे अधिकार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघ्यांच्या समन्वयाने केंद्रीय संसदीय मंडळ निर्णय घेईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झाला आहे का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी वरील उत्तर दिले.

संक्रांतीच्या पावनपर्वावर राज्यात 14 तारखेपासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत. जिल्हास्तरीय मेळावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात विभागीय मेळावे आहेत. मार्च महिन्यात राज्याचा मेळावा होईल. महायुती बूथस्तरापर्यंत मतदान केंद्रस्तरापर्यंत तालुकास्तरापर्यंत एकत्रित आणि एकजुटीने जनतेपर्यंत जाईल. महायुतीच्या 45 प्लस लोकसभा निवडणुकीत येतील. त्यासाठी आवश्यक ते काम करू, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या विषयाची चर्चा सुरू झाली नाही. कुठली जागा कोणाला द्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची याची चर्चाच नाही. त्यामुळे चर्चेपूर्वीच असे माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा महायुतीच्या बैठकीत येऊन बोलले पाहिजे. योग्य व्यासपीठावर त्यांनी आपली मागणी मांडली पाहिजे. कालच्या बैठकीत कडू नसल्यामुळे त्यांची मागणी काय आहे ते माहिती नाही, असा चिमटा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार बच्चू कडू यांना काढला. अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे. त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करणार आहेत. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंना अधिकार आहेत. त्यांनी कुठे जायचे आणि कुठे आरती करावी ते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

edited by sachin fulpagare

R...

Chandrashekhar Bawankule
Baramati LokSabha Constituency : संसदरत्न सुप्रिया सुळेंसमोर अंकिता पाटील-ठाकरे यांचा टिकाव लागणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com