Sunil Kamble Slap Police : पोलिसाला मारहाण करणे भाजप आमदारांना भोवले; सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल!

bjp mla sunil kamble slaps police Constable : आमदार सुनील कांबळे यांची पोलिस काँन्स्टेबल शिवाजी सरक यांच्याशी बाचाबाची...
Sunil Kamble Slap Police
Sunil Kamble Slap Police Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : ससून रुग्णालयात पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरण भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या मारहाण प्रकरणात आमदार कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनला रात्री उशिरा पर्यंत हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस काँन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण झाली होती. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Kamble Slap Police
NCP MLA Disqualification Timetable : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रसंदर्भातील वेळापत्रक जाहीर; कशी आहे प्रक्रिया?

काल शुक्रवारी (दि.5 जाने) सकाळी ससून रुग्णालयात हा प्रकार घडला होता. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहकार्यातून ससून येथे तृतीयपंथी समाजासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वार्डाचे उद्घाटन आणि ससून मधील कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ससून मध्ये आले होते.

या कार्यक्रमासाठी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पत्रिकेवर कांबळे यांचे नाव घालण्यात आले नव्हते. तसेच यावेळी उभारण्यात आलेल्या कोनशीलेवर कांबळे यांना स्थान न मिळाल्याने ते चिडले होते. त्यांनी कलेक्टर राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार करत यापुढील अशा पद्धतीचे काम खपवून घेतले जाणार नाही, असे कांबळे यांनी सुनावले आहे. तेथून बाहेर पडताना आमदार कांबळे यांची पोलिस काँन्स्टेबल शिवाजी सरक यांच्याशी बाचाबाची झाली.

Sunil Kamble Slap Police
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांनी पकडले आठ आरोपी!

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँगेस, अजित पवार गटाचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांच्याशी आमदार कांबळे यांची शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर कांबळे यांनी सातव या पदाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली. सातव हे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर हा प्रकार घडला होता. याची साधी दखल देखील घेतली न गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. कांबळे यांच्या वर्तनावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट तसेच अन्य राजकीय, सामाजिक संस्थांनी निषेध व्यक्त करत टीकास्त्र सोडले होते. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा समावेश होता.

दरम्यान, आमदार कांबळे यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करणे या कलमाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आमदार कांबळे यांच्या अडचणी आगामी काळात वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com