Pune LokSabha Election : मोहोळ, मुळीक, यांच्यानंतर आता शिवाजी मानकरांनीही लोकसभेसाठी ठोकला शड्डू

Shivaji Mankar : पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढण्याची तयारी...
Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Shivaji Mankar
Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Shivaji MankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढतच असून यामध्ये आता दररोज नवनवीन नावांची भर पडत आहे. भाजपकडूनदेखील निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्यांची संख्या वाढत असून काही इच्छुक उमेदवारांनी तर शहरात फ्लेक्स लावण्यासदेखील सुरुवात केली आहे. निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असून पक्षाने संधी दिल्यास निश्चितपणे निवडणूक लढविणार असल्याची बहुतांश इच्छुक उमेदवार बोलून दाखवत आहेत.

पुणे लोकसभा (Pune LokSabha) मतदारसंघाची जागा गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ताब्यात आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या 2014 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे (Congress) उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांचा पराभव करून भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे पुण्यातून खासदार झाले होते. त्यानंतर मागील पंचवार्षिकमध्ये भाजपचे गिरीश बापट (Girish Bapat) यांनी विजय मिळवत पुण्याचे खासदार होण्याचा बहुमान मिळवला. काही महिन्यांपूर्वी खासदार बापट यांचे निधन झाल्याने ही जागा सध्या रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक न झाल्याने सध्या पुणे शहराला कोणीही खासदार नाही.

Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Shivaji Mankar
Bjp Pune Politics : कुपन भरा... अयोध्येला चला! निवडणुकीपूर्वी भाजपची मतांसाठी बेगमी

खासदार बापट यांच्या जागेवर आगामी निवडणूक लढवण्याची तयारी भाजपमधील अनेक इच्छुकांनी दाखवली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. यामध्ये पुणे महापालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हे सर्व इच्छुक आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. या इच्छुकांमध्ये आता शिवाजी मानकर यांच्या नावाची भर पडली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर चौका-चौकांत मानकर यांचे फ्लेक्स आणि होर्डिंग लागले आहेत.

पुणे लोकसभेची जागा लढवण्यासाठी इच्छुक असलेले शिवाजी मानकर यांच्याकडे भाजपच्या फ्रेंड्स ऑफ बीजेपी याचे प्रदेश सहसंयोजक हे पद आहे. इतर उमेदवारांप्रमाणे मीदेखील लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक नक्कीच लढेन, असे मानकर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविली जाणार असून त्यासाठी सर्वच महायुतीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष काम करीत आहेत. उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होतो. वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार, असे मानकर यांनी जाहीर केले.

Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Shivaji Mankar
Pune News: मोदींमुळे पुण्यातील विमानांचे 'उड्डाण' रखडले; काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून फ्रेंडस ऑफ बीजेपीच्या वतीने दिवशी रामायण नृत्य, शंखनाद भक्तिगीते, महाआरती असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. डीपी रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी पाचच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी शिवाजी मानकर यांनी पत्रकारपरिषद घेतली. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. मानकर यांनी नाशिक येवला येथून विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात 2014 मध्ये निवडणूक लढविली होती. शिवसेनेच्या उमेदवारीवर मानकर यांनी ही निवडणूक लढवली होती.

मानकर यांनी आता पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने भाजपमध्ये आता उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार आपापल्या पद्धतीने कार्यक्रम घेत पुणेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच आता मानकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने येणाऱ्या काळात ही स्पर्धा अधिकच वाढणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.

(Edited By - Rajanand More)

R...

Murlidhar Mohol, Jagdish Mulik, Shivaji Mankar
Pune Politics : 'चंद्रकांतदादांच्या बदनामीसाठी मेधा कुलकर्णींची मटका अड्ड्यावर धाड'; काँग्रेस शहराध्यक्षांनी उडवली खळबळ!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com