Pune Lok Sabha Exit Poll : पुणे ना रवीभाऊंचे, ना वसंततात्यांचे; मुरलीअण्णांचे?

Pune Lok Sabha Election 2024 Exit Poll bjp Murlidhar Mohol vs Ravindra Dhangekar : एक्झिट पोलनुसार मोहोळ हे माहापालिकेतून थेट दिल्लीच्या राजकारणात जाणार असे दिसत आहे.
Pune Exit Poll
Pune Exit Poll Sarkarnama

Pune Analysis : पुण्यात भाजपचा कोणीही उमेदवार असेन; तर त्याला अडीच-तीन लाख मतांचे 'लीड' मिळेल, असे छातीठोकपणे सांगणार्‍या भाजपमधील राजकीय ज्योतिषांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मात्र, धडकी भरली. या निवडणुकीत 'लीड'साठी नव्हे जिंकण्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) प्रचंड आक्रमक व्हावे लागले आणि अगदी आमदार, माजी नगररसेवकांच्या तिकिट कापण्याची भाषा त्यांनी बोलून दाखवली.

अर्थात, भाजपविरोधी मतांची पद्धतशीरपणे मोट बांधून, भाजपला हरविण्यासाठी 'गनिमी कावा' करणाऱ्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांच्या चर्चेने पुण्याचा निकाल फिरण्याचे अंदाजही बांधले गेले. परिणामी, पुणे जिंकणे भाजपला सोपे नसल्याचेच राजकीय वर्तुळातील चर्चेतून पुढे आले. अशातच पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे जिंकतील हे एक्झिट पोलमधून जाहीर होत आहे. मात्र, त्यांचे 'मार्जिन' किती असेन, याकडे लक्ष राहणार आहे.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या गिरीष बापट (Girish Bapat) यांना जवळपास 3 लाख 20 हजारांचे लीड होते. म्हणजे, या निवडणुकीत त्यांना सव्वासहा लाख मते मिळाली होती. पुण्यात 2014 पासून भाजपची (BJP) ताकद वाढली असून, या काळात पुण्यातील 8 आमदार भाजपचे राहिले. त्यानंतर महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत या पक्षाचे 99 नगरसेवक निवडून आले.

Pune Exit Poll
Sandipan Bhumre : 'कसला एक्झिट पोल... विजय माझाच!' संदिपान भुमरेंचा कॉन्फिडन्स

पुण्यात भाजपचे एकहाती वर्चस्व असल्याचे कागदावरील ताकदीने दिसून येते. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्या धंगेकरांनी भाजपपुढे आव्हान उभे केले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) काहीशी फिरवल्याचे चित्र दिसून आले. मात्र, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवकांच्या आकड्याला शोभेल इतके लीड मोहोळांना असणार का, याची चर्चा रंगली. त्यात, भाजपच्या एका माजी खासदाराने मोहोळांना पाडण्यासाठी धंगेकरांना छुपी रसद पुरविण्याचा मुद्दा पुढे आला आहे. या निवडणुकीत धंगेकरांनी चांगली फाइट दिली भाजपच्या ताकदीपुढे निभाव लागणार नाही असे दिसत आहे. एक्झिट पोलनुसार मोहोळ हे माहापालिकेतून थेट दिल्लीच्या राजकारणात जाणार असे दिसत आहे.

Pune Exit Poll
Andhra Pardesh Exit Poll 2024 : जगनमोहन यांच्यासह बहिणीचाही सुपडा साफ; सर्वात धक्कादायक निकाल लागणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com