Sandipan Bhumre : 'कसला एक्झिट पोल... विजय माझाच!' संदिपान भुमरेंचा कॉन्फिडन्स

Chatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Sandipan Bhumre confident to defeat Chandrakant Khaire : शिवसेना फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठी सहानुभूती असल्याचे दिसून आले. त्यातच चंद्रकांत खैरे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे स्पष्ट केले होते.
Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Chandrakant Khaire, Sandipan Bhumresarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एमआयएम, ठाकरे गट आणि शिंदे गट अशी तिरंगी लढत आहे. यात ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे बाजी मारणार असल्याचा अंदाज टीव्ही 9 पोलस्ट्राट एक्झिट पोलने वर्तवला आहे. यावर शिंदे गटाचे संदिपान भुमरेंनी पोलचे आकडे काहीही असो विजय माझाच होणार, असा कॉन्फिडन्स व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचे इम्तियाज जलील, शिंदे गटाचे भुमरे आणि ठाकरे गटाचे खैरे आपले नशिब आजमावत आहेत. यात खैरे बाजी मारत असल्याचे पुढे येत आहे. या अंदाजावर आक्षेप घेत भुमरेंनी एक ते दीड लाखांनी आपलाच विजय होणार असल्याचे ठासून सांगितले आहे.

भुमरे म्हणाले, एक्झिट पोलचे आकडे मी मानत नाही. या पोलचे आकडे काहीही असोत, येथून फक्त माझाच विजय होणार आहे. या मतदारसंघातून एक ते दीड लाखांच्या मताधिक्यानी विजयी होणार आहे. हे 4 जूनला महाराष्ट्राला समजेल, असा विश्वासही भुमरेंनी यावेळी व्यक्त केला.

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Loksabha Election Exit Poll : उत्तर- मध्य मुंबईत भाजपला उमेदवार बदलण्याचा फटका!, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर

दरम्यान, शिवसेना फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठी सहानुभूती असल्याचे दिसून आले. त्यातच चंद्रकांत खैरेंना यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे स्पष्ट केले होते. याचा फायदा खैरेंना होणार असल्याचे बोलले जात आहे. भुमरेंना मात्र यातील एकही मुद्दा मान्य नाही. त्यांनी सर्व बाबी धुडकात एक ते दीड लाखांनी विजयी होणार असल्याचे सांगितले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Exit Polls 2024 : सांगलीत ठाकरे अन् फडणवीसांना धक्का! 'पायलट' विशाल पाटलांचं विमान दिल्लीला सेफ लॅण्ड करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com