Pune Lok Sabha: आबांचे बंड झाले थंड! धंगेकरांना दिलासा; नाराज बागुल काँग्रेससाठी महाराष्ट्रभर फिरणार

Aba Bagul On Nana Patole: नाना पटोले यांनी पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस आपल्याकडे ठेवेल असा विश्वास दिला असल्याचं बागुल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Nana Patole, Aba Bagul, Ravindra Dhangekar
Nana Patole, Aba Bagul, Ravindra DhangekarSarkarnama

Pune Lok Sabha Election 2024: निष्ठावंतांना डावललं जात असल्याचं सांगत पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल (Aba Bagul) यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंड पुकारले होते. मात्र पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ आले असताच, त्यांचे हे बंड थंड करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना यश आल्याचं दिसत आहे.

शिवाय कालपर्यंत रवींद्र धंगेकर हा काँग्रेसने चुकीचा उमेदवार दिला असल्याचं म्हणणारे बागुल आज रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हेच निवडणूक जिंकणार, असं म्हणत आहेत. त्यामुळे पटोले यांनी नेमका कोणता आश्वासनाचा डोस बागुल यांना दिला आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

काँग्रेस (Congress) पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत बाहेरून आलेल्या रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात बागुल (Aba Bagul) यांनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे मेणबत्ती लावून प्रतिकात्मक आंदोलन केले होते. यावेळी बागुल यांनी काँग्रेस पक्षात निष्ठेची हत्या झाली आहे, असे शब्द लिहिलेला शर्टही घातला होता. तसेच काँग्रेस पक्षात सातत्याने निष्ठावंत कार्यकर्ते-नेत्यांवर अन्याय करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत आयाराम-गयाराम लोकांना संधी दिली जात आहे. यामुळे पक्षाशी निष्ठावंत राहिलेला कार्यकर्ता भरडला जात आहे. याची दखल पक्षाच्या हायकमांडने घ्यावी अशी मागणी देखील बागुल यांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर बागुल यांनी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारापासून लांब राहत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली होती. यानंतर बागुल हे भाजपामध्ये (BJP) प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्याने बागुल यांचा भाजप प्रवेश झाला नसल्याच्या देखील चर्चा दरम्यानच्या काळात पाहायला मिळाल्या. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बागुल यांची भेट घेतली होती. मात्र त्यांना बागुल यांची नाराजी दूर करण्यात अपयश आल्याचं बोललं जात होतं.

Nana Patole, Aba Bagul, Ravindra Dhangekar
Lok Sabha Election 2024 : फक्त मुस्लिमांनाच जास्त मुलं असतात का? मला 5 आहेत! खर्गेंचा मोदींवर पलटवार

त्यानंतर बागुल यांनी नाना पटोले (Nana Patole) यांची काल भेट घेतल्याचे समोर आलं. त्या भेटीनंतर आज आबा बागुल यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच रवींद्र धंगेकर हे पुण्यातून बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाना पटोले यांनी पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस आपल्याकडे ठेवेल असा विश्वास दिला असल्याचं बागुल यांनी यावेळी सांगितलं. आधीच्या तीन निवडणुका हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात असून त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघावरती काँग्रेसने अधिकार सांगावा आणि उमेदवार द्यावा, अशी मागणी आपण पटोला यांच्याकडे केले असून त्यांनी ती मागणी मान्य केली असल्याचं बागुल यांनी सांगितलं.

तसेच नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हे पद आपल्याला देणार असल्याचे सांगितलं असून आगामी निवडणुकांमध्ये पटोले यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची जबाबदारी दिली असल्याचंही बागुल यांनी यावेळी सांगितलं. बागुल यांच्या पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याच्या घोषणेचा रवींद्र धंगेकर यांना किती फायदा होणार? आणि लोकसभा निवडणुकीदरम्यानच पर्वती विधानसभेचा मुद्दा उपस्थित केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस मधील तणाव वाढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com