New Delhi News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाला आहे. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसला टार्गेट केले जात आहे. तर काँग्रेसकडूनही मोदींवर पलटवार केला जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळणार असल्याची जाणीव झाल्याने मोदी निराश झाल्याचा दावा कर्गे यांनी केला आहे.
छत्तीसगडमध्ये मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत खर्गेंनी (Mallikarjun Kharge) मोदींवर टीका केली. ते म्हणाले, आघाडीची वाटचाल बहुमताकडे सुरू असल्याने असल्याने मोदी (PM Narendra Modi) मंगळसुत्र आणि मुस्लिमांवर बोलत आहेत. ते म्हणत आहेत की आम्ही तुमची संपत्ती लुटू आणि जास्त मुलं असलेल्यांना देऊ. पण गरीब लोकांनाच अधिक मुलं असतात. केवळ मुस्लिमांना अधिक मुलं असतात का? (Latest Political News)
संपत्ती कमी असूनही गरिबांना अधिक मुलं असतात. पण मोदी केवळ मुस्लिमांविषयी का बोलत आहेत? मुस्लिमही या देशाचे नागरिक आहेत. मला पाच मुलं आहेत आणि मी एकटाच आहे. माझे घर जाळले तेव्हा माझी आई, बहीण आणि चुलत्यांचा त्यामध्ये मृत्यू झाल्याचे खर्गे यांनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पंतप्रधान मोदींकडून सातत्याने काँग्रेसचा जाहीरनामा आणि वारसाहक्क करावरून निशाणा साधला जात आहे. दोन दिवस महाराष्ट्रात झालेल्या सभांमध्येही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लोकांच्या संपत्तीची एक्स रे करून त्या संपत्तीतील वाटा घुसघोर आणि अधिक मुलं असलेल्यांना वाटणार आहे, असे मोदींकडून सभांमध्ये सांगितले जात आहे.
पंतप्रधानांकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काही वर्षांपुर्वीच्या विधानाचाही आधार घेतला जात आहे. देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचा दावा या विधानामध्ये केल्याचे मोदींकडून सांगितले जात आहे. तसेच सॅम पित्रोदा यांच्या वारसा कराच्या मुद्द्यावरून भाजपकडून काँग्रेसले घेरले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.