Pune News: मतदार यादीतून नाव गायब झाल्याचे प्रकरण हायकोर्टात...

Pune Lok Sabha Election 2024 News :यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीतून नाव गायब झाल्याने अनेकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागलं. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक यादीतून नाव गायब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
Voter List
Voter ListSarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) मतदार यादीतून नाव गायब झाल्याने अनेकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागलं. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक यादीतून नाव गायब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मतदार यादी अपडेट करण्याचं काम करण्यात येतं. मात्र या मतदार याद्या अपडेट होताना अनेक नाव गाळली जात असल्याचं समोर आला आहे. या विरोधात आता पुण्यातील सामाजिक संघटना हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

प्रत्येक निवडणुकीत नियमित मतदान करणाऱ्या मतदारांची (Voter) नावे अचानक मतदान यादीतून गायब होण्याच्या हजारो घटना घडतात आणि निवडणूक आयोग मतदारांनी याद्या तपासल्या नाहीत असे म्हणून याची जबाबदारी झटकून मोकळे होते. म्हणून मतदार यादीतून एखाद्या मतदाराचे नांव कमी करताना काय प्रक्रिया अवलंबली जाते, याची माहिती सामाजिक संघटने कडून माहिती अधिकारात निवडणूक आयोगाकडे मागण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सांगण्यानुसार निवडणूक यादीतून दुबार नावनोंदणी किंवा मतदारांचा पत्ता बदलणे किंवा मतदारांचा मृत्यू यापैकी कोणत्याही कारणाने‌ नाव वगळता येते. मात्र यापैकी कोणत्याही कारणाने नांव वगळताना फॉर्म 7 भरुन घेणे आवश्यक आहे. तसेच मतदाराला नाव वगळण्यापूर्वी रजिस्टर पत्राप्रमाणे नोटीस दिलीच पाहिजे. त्यानंतर निवडणूक आयोगाचा कर्मचारी स्वतः येऊन याबाबत खात्री करतो. मात्र ही सगळी प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून करण्यात येते का नाही या बाबत साशंकता आहे.

त्यामुळे सजग नागरिक लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगाला जाब विचारत नाहीत, तोपर्यंत मनमानी पद्धतीने निवडणूक याद्यांमधून नांवे वगळले जाण्याच्या घटनांना आळा बसणार नाही. शिवाय याबाबतची सर्व माहिती आमच्याकडून गोळा केली जात असून सर्व माहिती जमा झाली की आम्ही हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल करणार असल्याचं सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता हायकोर्टात (High Court) हे प्रकरण गेल्यानंतर आयोगाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Voter List
Lok Sabha Election 2024 : अखेरच्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात तब्बल 904 उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com