Pune Lok Sabha Election : रवींद्र धंगेकरांचा प्रचार ठाकरेंच्या सेनेने थांबवला ?

Ravindra Dhagekar Lok Sabha Candidate from Congress : महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा आहे. तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि मावळमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे असणार आहेत.
ravindra dhangekar uddhav thackeray
ravindra dhangekar uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिघाडी झाले असल्याचे चित्र समोर आले आहे. पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा प्रचार थांबवला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रचार थांबवण्याबाबतच्या सूचना ठाकरे गटाला संपर्क प्रमुख सचिन आहिर Sachin Ahir यांनी दिल्या असल्याचं बोललं जात आहे. मावळमध्ये महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे काम काँग्रेस करत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. latest update on pune loksabha election.

महाविकास आघाडीकडून MVA पुणे लोकसभा मतदारसंघात Pune Loksabha Constituency काँग्रेसचा उमेदवार उभा आहे. तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि मावळमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे असणार आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना तेथील मित्र पक्षातील उमेदवाराचं काम करणं क्रमप्राप्त आहे. महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाचे मावळ मधील उमेदवार संजोग वाघिरे यांच्या प्रचारामध्ये काँग्रेसचा सहभाग कुठेतरी कमी प्रमाणात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. याबाबतच्या तक्रारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी याबाबत काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केली आहे. Pune Lok Sabha Election Ravindra Dhangekar campaign stopped by Thackeray Shivsena Group

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ravindra dhangekar uddhav thackeray
Lok Sabha Election 2024 : बेरोजगारांना काम, शेतकऱ्यांच्या उसाला दाम हीच माझी औकात; मुंडेंच्या टीकेला सोनवणेंचं प्रत्युत्तर

तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सचिन अहिर Sachin Ahir यांनी पुण्यातील उद्धव ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांना काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांचं काम थांबवण्याचा सूचना दिल्या असल्याचं बोललं जात आहे. काही काळासाठी शिवसेना प्रचारापासून अलिप्त राहिली असल्याचे बोलले जात आहे .लोकसभा निवडणुकीपूर्वीच आघाडीत बिघाडी झाली का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाकरे गटाकडून खुलासा

दरम्यान आता याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे Sanjay More यांनी याबाबत खुलासा केला आहे. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे काम जोमाने चालू आहे. शिवसेना प्रचारामध्ये सहभागी आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातील Vidhan sabha Constituency मेळावे शिवसैनिकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या पार पडले. इथून पुढे सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार शिवसेना हिरीरीने सहभागी होऊन कसब्याप्रमाणे विजय खेचून आणणार आहे. आजही काँग्रेस भवन Congress Bhavan येथे बैठकीला आम्ही उपस्थित राहणार आहोत. संजय मोरे यांनी खुलास्यामध्ये सांगितले आहे.

Edited By : Rashmi Mane

ravindra dhangekar uddhav thackeray
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून शशिकांत शिंदे; राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, 15 एप्रिलला अर्ज भरणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com