Devendra Fadnavis News : फडणवीस माजी नगरसेवकांना मते खेचण्याचे ‘टार्गेट’ देणार ?

Maharashtra Lok Sabha Election 2024 : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाला सुरुंग लावत विजय मिळविला होता..
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने महायुतीत सहभागी झालेल्या पक्षांच्या माध्यमातून केला आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा ध्यास महायुतीने घेतला आहे. यासाठी विविध पातळीवर नियोजन केले जात आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या पुणे शहर, बारामती, शिरूर, आणि मावळ या लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार कसे विजयी होतील, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. पुणे शहर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला अशी ओळख एकेकाळी पुणे लोकसभा मतदारसंघाची होती. काही अपवाद वगळता या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुणे शहरातून भाजपची उमेदवारी मिळालेले अनिल शिरोळे विजयी होऊन दिल्लीत गेले. तर गेल्या पंचवार्षिक मध्ये 2019 च्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट या मतदारसंघातून विजयी झाले. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पुणेकर मतदारांनी भाजपच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. तर काँग्रेसचा बालेकिल्ला परत घेण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Amol Kolhe On Shivaji Aadhalrao Patil: चला पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही, कोल्हेंनी स्वीकारले आढळरावांचे आव्हान !

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात काही प्रमाणात शांतता आहे. मोहोळ हे दररोज वेगवेगळ्या भागात आणि परीसरात जाऊन आपला प्रचार करत असले तरी त्यामध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही. काँग्रेसने कसबा विधानसभेचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाला सुरुंग लावत विजय मिळविला आहे. या निवडणुकीत देखील भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा दावा केला जात होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर हा दावा फोल ठरला.

कसब्याच्या निवडणुकीत झालेल्या चुका लोकसभेच्या निवडणुकीत दुरूस्त करून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे अधिकाधिक मताधिक्याने विजयी व्हावे,यासाठी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्टिव्ह झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस हे माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. यामध्ये प्रत्येक भागातून भाजपच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळेल, याचा अंदाज घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्रत्येक नगरसेवकाला मते घेण्याचे उदिष्ट दिले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. कोरेगाव पार्क परिसरातील सनई मंगल कार्यालयात ही बैठक होणार असून यासाठी भाजपचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadnavis
Lok Sabha Election Administration News : तुमचं नाव मतदारयादीत आहे का? नसेल तर काळजी करू नका, 'असा' घ्या शोध !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com