Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच शहरातील विविध भागात मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळच्या टप्प्यात मतदान करण्यासाठी अनेक उत्साही पुणेकर घराबाहेर पडले असून मतदान केंद्राच्या बाहेर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला जात आहे.
पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More), तर 'एमआयएम'चे अनिल सुंडके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे. त्यामुळे मुरली नक्कीच दिल्लीला जाईल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या आईंनी व्यक्त केला आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांचे कुटुंबियांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकशाही बळकट करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र येऊन मतदान करावं असा आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
मागील 20 वर्ष मुरलीधर मोहोळ यांनी खूप काम केलं. त्यांना भाजपने दिलेली लोकसभेची उमेदवारी ही त्याचीच पावती आहे, असे मुरलीधर मोहोळांच्या पत्नी मोनिका मोहोळ (Monika Mohol) यांनी सांगितले. पुणे लोकसभेच्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ शंभर टक्के जिंकणार असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. यावेळी कुटुंबातील सर्वांचे डोळे पाणावले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.