Chandrakant Patil News : चंद्रकांतदादांना फिरायचंय 'टी शर्ट अन् गॉगलवर'; पाटलांच्या मनात काय?

Pune Loksabha Election 2024 : मी टी शर्ट आणि गॉगल घालतो आणि आपण एकत्र.... पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा काय म्हणाले बघा?
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil Press Confernce Pune : पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्लस्टरचे प्रमुख म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीतील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांसह बैठक घेणार आहेत. त्यानुसार रविवारी बारामती मतदारसंघाची बैठक पार पडली असून, आज पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांची बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना मोदींचा फॅक्टर तपासण्यासाठी सर्व्हे करू. loksabha Election 2024

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'पुणे लोकसभेबाबत विरोधक असं पर्सेपन्शन तयार करताहेत की, ही सीट भाजपसाठी अवघड आहे. पण आमचे पुण्यातील मताधिक्य मागीलवेळीपेक्षा वाढेल. मागील वेळी आम्हाला सहा लाख 31 हजार मते मिळाली होती. आता आमच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांची मते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सेनेची एक लाख मते कमी झाली तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दीड लाख मते वाढणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या उमेदवाराने विचार करून उभे राहावे, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. Pune Loksabha Election 2024

विरोधक इलेक्ट्राेल बाँडमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करत असले तरी प्रत्यक्षात इलेक्ट्राेल बाँडचा कोणताही घोटाळा झालेला नाही. सगळेच पैसे चेकने आलेत. त्यामुळे विरोधकांनी किती आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनतेला मूळ वास्तव माहिती असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil
Shrinivas Pawar on Ajit Pawar : सख्ख्या भावाचा अजितदादांवर हल्लाबोल; ‘....त्यासारखा नालायकपणा नाही’

भाजपकडून (BJP ) सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Loksabha Constituency) उमेदवारीची चाचपणी सुरू असून, आत्तापर्यंत तीन उमेदवारांबाबत भाजपकडून विचार करण्यात आला आहे. सोलापूरमध्ये सारं काही आलबेल नसल्याने वेगवेगळ्या उमेदवारांची चाचणी फडणवीस स्वतः करत आहेत का? याबाबत प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे असे नेते जन्माला आले आहेत. ज्यांनी भल्या भल्या नेत्यांची झोप उडवली आहे. फडणवीस प्रत्येक गोष्ट तावूनसुलाखून घेतात. त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. सोलापूरच्या निवडणुकीला अद्याप खूप अवधी असून, फडणवीस तावूनसुलाखून उमेदवार देतील.

बारामतीमधील सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्या उमेदवारीबाबत बोलताना पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात जेवढं लांबचं दिसतं तेवढं कोणालाच दिसत नाही. ते कधीच चुकीचा पत्ता काढत नाहीत, असे सूचक विधान पाटील यांनी केलं.

राज्यातील 48 जागा भाजप जिंकणार असून, मोदी फॅक्टर अद्यापही कायम असल्याचे सांगताना पाटील म्हणाले, मी पण वेष बदलतो आणि तुमच्या सोबत येतो. काल मी फॅमिली फंक्शनमध्ये 'टी शर्ट आणि गॉगल घातला होता. तेव्हा अनेकांना मला ओळखता आलं नाही. मी टी शर्ट आणि गॉगल घालतो आणि आपण एकत्र सर्व्हे करू. तुम्ही म्हणाल त्या शंभर लोकांना भेटू. शंभरपैकी नव्वद लोक म्हणतील की मोदी मोदी मोदी. मोदी ( Narendra Modi ) फॅक्टर खाली किती पोहाेचलाय हे तपासता येईल, असे पाटील म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

R

Chandrakant Patil
Shirur Loksabha Election 2024 : मराठे लोकसभेच्या रिंगणात! शिरूर लोकसभेसाठी शंभर उमेदवारी अर्ज...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com