Pune LokSabha : मिल बैठे तीन यार.. सुनीलअण्णा, जगदीशभाऊ अन् बापू..!

Tingre, Mulik, Pathare unite in vadgaonsheri : वडगाव शेरीमध्ये टिंगरे, मुळीक, पठारेंचे मनोमिलन होणार की मोहोळ यांचा प्रचार केवळ फार्स ठरणार ?
Pathare, Mulik, Mohol, Tingare
Pathare, Mulik, Mohol, TingareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर मतदारसंघातून महायुतीच्या वतीने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीने कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक इच्छुक होते.

मुळीक यांचे नाव अखेरच्या टप्प्यात कापण्यात आल्याने ते नाराज होते. मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर वडगाव शेरी भागात घेण्यात आलेल्या मेळाव्यात जगदीश मुळीक अनुपस्थित राहिले होते. त्यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मुळीक हे नाराज असल्याचे समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुळीकांना भेटीसाठी बोलावून त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर मुळीक यांनी आपण लोकसभा निवडणुकीत सक्रिय असल्याचे जाहीर केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pathare, Mulik, Mohol, Tingare
Lok Sabha Election 2024 : ताई-वहिनींच्या लढतीत बसपा एन्ट्री करणार

नऊ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांना बरोबर घेत अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. अजितदादा सत्तेत सहभागी झाल्याने अनेक आमदारांनी त्यांच्याबरोबर जाणे पसंत केले. अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. इतके दिवस ज्यांच्या विरोधात लढत होतो, त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता स्थानिक नेत्यांना बसावे लागत आहे. वडगाव शेरी येथे महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत हे प्रकर्षाने पाहायला मिळाले.

माजी आमदार बापू पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. त्यानंतर हे सर्व नेते एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत संधी मिळताच एकमेकांवर टीकेची झोड उठवित होते. मात्र, नऊ महिन्यांपूर्वी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आता या नेत्यांना एकमेकांचे गुणगान करावे लागत आहे. लोकसभा उमेदवार मोहोळ यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमात गेले अनेक महिने एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जगदीश मुळीक, सुनील टिंगरे, बापू पठारे ही नेते मंडळी एकाच व्यासपीठावर एकमेकांचे हात हातात घालून बसल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माेहाेळ यांना विजयी करण्याचा संकल्पदेखील या नेत्यांनी या वेळी केला.

Pathare, Mulik, Mohol, Tingare
Parbhani Lok Sabha News: परभणीत धनुष्यबाण 35, तर घड्याळ 25 वर्षांनंतर निवडणुकीतून गायब

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतभेद आणि हेवेदावे विसरून एकत्र आलेल्या या तीन नेत्यांमधील कटुता दूर होऊन त्यांचे मनोमिलन होऊन पुढील काळात हे चित्र पाहायला मिळेल की केवळ लोकसभेपर्यंत हे मनोमिलन कायम राहणार, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने हे तीनही राजकीय नेते एकत्र आल्याने त्यांचे कार्यकर्तेदेखील एकमेकांशी जुळून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

R

Pathare, Mulik, Mohol, Tingare
Amol Kolhe News : खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता? शिरूरमध्ये लागले बॅनर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com