Parbhani Lok Sabha News: परभणीत धनुष्यबाण 35, तर घड्याळ 25 वर्षांनंतर निवडणुकीतून गायब

Loksabha Election 2024 : परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला म्हणून गेल्या 35 वर्षांत अवघ्या 13 महिन्यांचा कार्यकाळ वगळता या ठिकाणी शिवसेनेचा खासदार कायम धनुष्यबाणावर निवडून आला आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama

Parbhani News : परभणी लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाच्या हक्काची जागा आहे. महायुतीच्या ध्येय धोरणात सापडल्यामुळे तर वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा मिळाली नसल्यामुळे जानकरांच्या रासपसाठी सोडावी लागली. त्यामुळे परभणीत शिवसेना ठाकरे गटाला 35 वर्षांत पहिल्यांदा धनुष्यबाणाशिवाय निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे.

26 एप्रिलला पहिल्यांदाच धनुष्यबाण व घड्याळ चिन्ह मतदान यंत्रावर नसणार आहे. त्यामुळे मतदारांना त्यांचा उमेदवार व त्यांचे चिन्ह समजावून घेऊन मतदान करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. (Parbhani Loksabha Election 2024)

1990 च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती. मराठवाड्याची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. एकेकाळी आठपैकी 4 खासदार शिवसेनेचे, तर चार खासदार भाजपचे निवडून आले होते. प्रत्येक निवडणुकीत प्रचारासाठी व निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष व चिन्ह महत्त्वाचे ठरते. प्रत्येक पक्षाच्या विचारधारेशी जोडलेले निवडणूक चिन्ह असते. या चिन्हामुळेच निवडणूक काळात प्रचार करणे सोपे जाते. त्यामुळेच हे चिन्ह अनेक वर्षांपासून पक्षाशी निगडित राहिले आहेत.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे 'हे' 40 शिलेदार राज्यभर उडवणार धुरळा

जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठी उभी फूट पडली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार बाहेर पडले. त्यानंतर शिंदे भाजपसोबत गेल्याने ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेसॊबत गेलेले आमदार व खासदार म्हणजेच खरी शिवसेना म्हणून त्यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्षाचे नाव दिले. त्यामुळे आता 2024 मध्ये होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला धनुष्यबाणशिवाय निवडणूक लढवत आहे.

1989 पासूनचा परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहिला तर या ठिकाणी एक वेळेसचा अपवाद वगळता सलग सहा वेळा शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार व खासदार पुन्हा निवडून येत नाही, असा येथील इतिहास आहे.

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 1989-91 अशोक देशमुख, शिवसेना,1991-96 अशोक देशमुख शिवसेना, 1996-98 सुरेश जाधव, शिवसेना, 1998-99 सुरेश वारपूडकर, काँग्रेस 1999-2004 सुरेश रामराव जाधव, शिवसेना 2004- 2009 तुकाराम रेंगे पाटील, शिवसेना, 2009 -2014 गणेशराव दुधगावकर, शिवसेना, 2014 -2019 संजय जाधव, 2019-2024 संजय जाधव शिवसेना खासदार झाले असून, शिवसेनेचे सर्वजण धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला म्हणून गेल्या 35 वर्षांत अवघ्या 13 महिन्यांचा कार्यकाळ वगळता या ठिकाणी शिवसेनेचा खासदार कायम धनुष्यबाणावर निवडून आला आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत शिवसेना उद्धव ठाकरे गट मशाल चिन्हावर पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरला आहे. पक्ष व चिन्ह गेल्याने सध्यातरी सहानुभूती संजय जाधव यांच्या बाजूने दिसत आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर 1999 पासून परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व राहिले आहे. परभणी हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. या पक्षाकडून राज्यसभेवर खासदार फाैजिया खान, तर विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुराणी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांशी तुटले, पण एमआयएमने दुसऱ्या भावाशी जुळवले...

मात्र, जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत 40 आमदार व एक खासदार बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार व खासदार म्हणजेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्यांच्या गटाला घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेस असे नाव दिले आहे. त्यामुळे आता 2024 मध्ये होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत शरद पवार गटाला घड्याळ चिन्हशिवाय निवडणूक लढवावी लागणार आहे.

दुसरीकडे परभणी मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवार गटाला राजेश विटेकर यांच्यासाठी हवा होता. मात्र, ऐनवेळी महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांच्या रासपला ही जागा सोडण्यात आली. राष्ट्रवादीमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे राष्ट्रवादीला हक्काची परभणी जागा तडजोडीच्या राजकारणात राष्ट्रीय समाज पक्षाला सोडावी लागली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे 25 वर्षांत प्रथमच येथील निवडणूक घड्याळ चिन्हाविना लढावी लागणार आहे.

R

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 : आंबेडकर बंधू एकाच वेळी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com