Pune Loksabha- Vidhansabha Election News: शिंदे-ठाकरे गटात अस्वस्थता; भाजप-राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याने सैनिक सैरभैर!

Pune Politics : पुणे जिल्ह्यात शहर आणि जिल्हा असे विधानसभेचे २१ मतदारसंघ आहेत.
Uddhav Thackeray | Eknath Shinde
Uddhav Thackeray | Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune Loksabha And Vidhansabha Election News Update : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना, विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत, विधानसभा आणि लोकसभा मतदारासंघप्रमुखांची नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात संभाव्य उमेदवारीच्या संकेताने अनेक पदाधिकारी कामाला लागले आहेत. मात्र एकीकडे महाविकास आघाडीमुळे शिवसेना ठाकरे गटाची राष्ट्रवादीकडून तर दुसरीकडे भाजप शिवसेना युतीमुळे शिंदे गटाची कोंडी होतानाचे चित्र आहे. या कोंडीमुळे शिवसेना दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुणे जिल्ह्यात शहर आणि जिल्हा असे विधानसभेचे २१ मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादी कॉग्रेसचे ८ आणि कॉंग्रेसच्या ३ आमदारांचा समावेश असून, यामध्ये एकाही मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नाही. तर लोकसभेच्या चार मतदारसंघामध्ये मावळ (श्रीरंग बारणे) पुणे (भाजप) शिरूर (राष्ट्रवादी कॉंग्रेस - अमोल कोल्हे) (Amol kolhe) आणि बारामती (राष्ट्रवादी कॉंग्रेस - सुप्रिया सुळे) भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून आणि भाजप कडून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसत असल्याचे दोन्ही गटाचे शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत.

Uddhav Thackeray | Eknath Shinde
Pune CBI Raid : पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त रामोड यांच्या कार्यालयावर 'सीबीआय'चा छापा

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपामध्ये नैसर्गिक न्यायतत्वाने विद्यमान सदस्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जात असल्याचे संकेत असतात. यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचा एकही आमदार नसल्याने त्यांना जागा वाटपासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

Uddhav Thackeray | Eknath Shinde
Jayant Patil On Death Threat : शरद पवारांना आलेल्या धमकीवर जयंत पाटील म्हणाले, 'हे चाळे कोण करतंय ते सगळ्यांना..'

शिवसेना ठाकरे गटाकडून कोथरूड, शिवाजीनगर वर दावा शक्य

आगामी विधानसभा जागा वाटपामध्ये पुणे शहरातील कोथरूड आणि शिवाजीनगर या दोन पारंपारिक मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) दावा करण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदारसंघावर माजी आमदार शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे आणि दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्यामाध्यमातून शिवसेनेचे वर्चस्व होते. सध्या या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे चंद्रकांत पाटील आणि सिद्धार्थ शिरोळे हे भाजपचे आमदार असून, याठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे बळ कमी आहे. यामुळे या मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने दावा केल्यास कोथरूड येथील लढत चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत मोकाटे अशी होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना शिंदे गटाकडून हडसपर वर दावा

शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चेतन तुपे आमदार असून, त्यांनी भाजपचे तत्कालीन आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला आहे. यामुळे या ठिकाणी युतीच्या वाटपात शिंदे गटाने दावा केला आहे.

Uddhav Thackeray | Eknath Shinde
Saurabh Pimpalkar with BJP Leaders: पवारांना धमकी देणाऱ्या पिंपळकर'चे भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल...

जुन्नरमधून बुचके कि सोनवणे

जुन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पारंपारिक ताकद आहे. मात्र शिवसेनेतील सुंदोपसंदीमुळे विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी होत असल्याचा इतिहास आहे. याचा फटका बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे आणि आशाताई बुचके यांना बसला आहे. शिवसेनेतील फुटीमुळे आता शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेल्याचा फायदा आशा बुचके यांना होण्याची शक्यता आहे. आशाताई बुचके या सलग तीन वेळा पराभूत झाल्यानंतर आता चौथ्यांदा भाजपकडून नशीब अजमावत आहेत. तर माजी आमदार सोनवणे हे शिंदे गटाकडून इच्छुक असून, शिंदे गट आणि भाजपाच्या युतीत हि जागा कोणाकडे जाते यावर दोघांचे नशीब अवलंबून आहे. मात्र सध्या तरी या जागेवर भाजपने प्रबळ दावा केल्याचे चित्र असल्याने सोनवणे यांनी बंडखोरी केली तर या सुंदोपसंदीचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसेच्या अतुल बेनकेंना होण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसैनिकांची मात्र कुंचबणा होत असल्याचे चित्र आहे.

शिरूर’ची जबाबदारी आ. लांडगे यांच्याकडे तर आढळराव सेफ झोन मध्ये

शिरूर लोकसभेच्या प्रमुखपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे. यामुळे शिरूरचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा आहे. मात्र शिरूर मध्ये शिवसेना (शिंदे) गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याची देखील चर्चा असून, या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी देखील अंतिम मानली जात आहे. तर महेश लांडगे हे राज्यात मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याने आढळराव पाटील यांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाल्याची चर्चा असून आढळराव सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com