Vishwambhar chaudhari : 'निर्भय बनो'चे विश्वंभर चौधरी यांचे नाव मतदारयादीतून गायब

Pune Loksabha : विश्वभंर चौधरी यांनी दोन मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीतील नाव तपासले मात्र दोन्ही ठिकाणी चौधरी यांचा नाव वगळण्यात आले होते.
vishwambhar chaudhari
vishwambhar chaudharisarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघात आज (सोमवारी) मतदार प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी एक पर्यंत पुण्यात 26.48 टक्के मतदान झाले होते. मात्र, मतदार यादीतून नाव वगळल्याचे, बोगस मतदान केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावे बोगस मतदान केल्याचे समोर आले. भाजप BJP विरोधात 'निर्भय बनो'च्या प्रचारसभा घेणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचे देखील नाव मतदारयादीतून गायब आहे.

vishwambhar chaudhari
Pune Lok Sabha News : धक्कादायक! काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावे बोगस मतदान; तक्रारींचा पाऊस...

⁠विश्वभंर चौधरी यांनी दोन मतदानकेंद्रावर जाऊन मतदारयादीतील Voter list नाव तपासले मात्र दोन्ही ठिकाणी चौधरी यांचे नाव वगळण्यात आले होते. या विषयी चौधरी यांनी एक दिवस आधीच फेसबूकवर एक पोस्ट टाकत जाहीर केले होते की ते मतदान करू शकत नाहीत. यादीत नाव नाही. आपण वरिष्ठ निर्वाचन अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा पत्ता जुना होता म्हणून नाव बाद झाली असं कळलं असे चौधरी vishwambhar chaudhari यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

⁠विश्वंभर चौधरी यांनी असीम सरोदे आणि पत्रकार निखिल वागळे यांच्याबरोबर राज्यभर 'निर्भय बनो'च्या सभा घेतल्या होत्या.सत्ताधारी भाजप आघाडीच्या विरोधात या सभा घेण्यात आल्या होत्या. पुण्यात घेण्यात आलेली निर्भय बनोची सभा देशभर गाजली होती.या सभेच्या दरम्यान पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता⁠.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बोगस मतदान

एकीकडे काहींची नावे मतदार यादीतून वगळ्याचे समोर येत असताना मतदानाच्या दिवशी बोगस मतदान होत असल्याच्या देखील तक्रारी करण्यात येत होत्या. कोथरुडमध्ये गौतमी पवार ही पहिल्यांदाच मतदारकेंद्रात मतदानासाठी आली होती. मात्र, तिच्या नावावर अधिच मतदान झाल्याचे समोर आले. कोथरुडमधील थोरात उद्यानातील मतदान केंद्रात हा प्रकार घडला. आपल्या नावाने कुणीतरी मतदान केल्याचे लक्ष्यात आल्याने गौतमीने संताप व्यक्त केला.

vishwambhar chaudhari
Pune Loksabha Election Update: मनसेच्या किशोर शिंदेंचा पारा चढला, होमगार्डला दाखवला इंगा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com