PMC News : तब्बल २५ वर्षानंतर मिळाली मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई; काय आहे प्रकरण ?

Pune News : गटाराच्या जलवाहिनीत गुदमरून १९९८ मध्ये झाला होता दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Pune PMC
Pune PMCSarkarnama
Published on
Updated on

आदित्य आरेकर

Pune Corporation News : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करताना दोन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १९९८ साली घडली होती. दरम्यान, पाठपुरावा करूनही संबंधितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळालेली नव्हती. आता तब्बल २५ वर्षानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

पुण्यातील जुन्या बाजाराजवळील शिवाजी स्टेडियमलगत असलेल्या झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली होती. त्यावेळी संबंधित कर्मचारी सांडपाणी वाहिनीत उतरून काम करत होते. त्यात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. आता त्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळाली आहे. महापालिकेच्या वतीने गुरुवारी (ता. १६) दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले. ही भरपाई तब्बल २५ वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळाली आहे. (Latest Marathi News)

Pune PMC
Konkan News : राणेंच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष

नाथा गुलाब कांबळे व रानबा आदिनाथ हावळे असे मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यातील कांबळे हे मलनिस्सारण विभागातील कर्मचारी होते. तर हावळे महापालिकेत रोजंदारी तत्वावर काम करत होते. दरम्यान, हे कर्मचारी २ नोव्हेंबर १९९८ रोजी शिवाजी स्टेडियम लगतच्या झोपडपट्टी गटारात उतरून सफाई करत होते. त्यावेळी त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

नाथा कांबळे यांची पत्नी ज्योती कांबळे यांना पुणे महापालिकेने वारसा हक्काने नोकरी दिली होती. तर रानबा हावळे यांच्या पत्नी सुनीता हावळे यांचीही आरोग्य खात्यात नेमणूक झाली होती. परंतु, त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. यासाठी कांबळे आणि हावळे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. मैला वाहिनी सफाईचे काम करीत असताना आणि १९९३ नंतर मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मधे दिला होता.

Pune PMC
Ganpatrao Gaikwad News : ''...ही तर पालिकेच्या तिजोरीची सफाई !''; आमदार गायकवाडांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापलं

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिकेने दोन्ही कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील अधीक्षक अभियंता संतोष तांदळे आणि कार्यकारी अभियंता सुनील अहिरे, उपअभियंता किसन दगडखैर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. धनादेश घेताना दोन्ही कर्मचाऱ्यांच्या पत्नींना भावना अनावर झाल्या होत्या. ही रक्कम मुलांच्या शिक्षणाठी उपयोगात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com