Pune Mahapalika Election : पुण्यातील युती-आघाडीची बिघडलेली समीकरणं भाजपाच्या पथ्यावर? मिशन 125+ साठी पोषक वातावरण

Pune Election: पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती न होऊ शकल्याने भाजपने सर्वाधिक 158 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर 7 जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात आल्या आहेत.
After BJP–Shiv Sena alliance break bjp has chance to win 125+ seats in Pune Municipal Corporation election.
After BJP–Shiv Sena alliance break bjp has chance to win 125+ seats in Pune Municipal Corporation election.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळाली होती. या लढतीमध्ये मतविभाजनाचा फायदा कुठेतरी भाजपाला झाला होता. त्यामुळे भाजपचे तब्बल 99 नगरसेवक निवडून आले होते. यावेळीही पुण्यात युती आणि आघाड्यांचा विचका झाल्याने पुन्हा एकदा 2017 ची चौरंगी लढत्यांची परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा भाजपला पोषक वातावरण तयार झाल्याचं दिसतं आहे. राजकीय जाणकारांच्या मते या वातावरणाचा फायदा भाजपला 125+ या त्यांच्या घोषणेच्या पुर्ततेसाठी होऊ शकतो.

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशीच आपण पुण्यात स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरु झाली. पण जागावाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे एकमत न होऊ शकल्याने युतीची चर्चा निर्णयापर्यंत पोहोचली नाही. परिणामी भाजप रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन निवडणूक लढवत आहे. भाजपने सर्वाधिक 158 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर 7 जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत पुण्यातील राष्ट्रवादीचा मतदार आपल्याकडेच राहिल याची काळजी घेतली आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडी सोडल्याने काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या पक्षांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे.

After BJP–Shiv Sena alliance break bjp has chance to win 125+ seats in Pune Municipal Corporation election.
Kolhapur Election : महायुती-महाविकास आघाडीशी लढत, अपक्षांची डोकेदुखी वाढणार; 10 दिवसांत मतदारांपर्यंत चिन्ह, नाव पोहोचविण्याचं मोठं आव्हान

अशा पद्धतीने चौरंगी लढत झाल्यास मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये सेक्युलर मतं विभागली जाणार आहेत. शिवसेनेचा विचार केल्यास हिंदुत्ववादी मत विभागली जाण्याची शक्यता असली तरी पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळं पुण्यातील भाजपला मानणारी हिंदुत्ववादी मतं एकसंध राहण्याची दाट शक्यता आहे.

मागील 10 वर्षातील पुणे शहरातील लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका भाजपने एकहाती जिंकल्या आहेत. मेट्रोसह इतर विकासकामांमुळं गेल्या दशकात भाजपाला मानणारा वर्ग पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळं एका बाजूला होणारं मतविभाजन आणि दुसरीकडं भाजपाला मानणारा वर्ग यामुळे भाजपचं मिशन 125 यशस्वी होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

After BJP–Shiv Sena alliance break bjp has chance to win 125+ seats in Pune Municipal Corporation election.
Eknath Shinde Shiv sena : हट्टी मुलांचं लगेच ऐकलं जातं..! शिंदेंनी तिकीट नाकारलेल्या खासदार म्हस्केंच्या लेकाची खदखद आली बाहेर...

पुणे शहरामध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळं एक प्रभाग हा तब्बल लाख ते दीड लाख मतदारांचा झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रभागाचा फायदा यापूर्वी देखील भाजपलाच झाला असल्याचं दिसून आलेला आहे. दोनपेक्षा चारच्या प्रभाग रचनेत भाजपला चांगलं यश मिळताना यापूर्वी देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळं एकूणच पुणे शहरातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपसाठी अत्यंत पोषक असं वातावरण असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com