PMC Election BJP: इच्छुकांची धाकधूक वाढली! भाजपची यादी नाही पण काहींना निरोप

Pune Municipal Election: BJP to Announce First Candidate List on Sunday : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष हे पक्ष नेतृत्वाकडे लागले आहे. ते कधी उमेदवारांची यादी जाहीर करतात याची वाट पाहत आहेत.
PMC Election BJP
PMC Election BJPSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी काल (ता.२६) जाहीर होणार होती. अनेक ठिकाणच्या नावांवर एकमत न होणे, बंडखोरी होण्याची शक्यता यामुळे भाजपने यादी जाहीर करण्याचे टाळले आहे. पण ज्यांच्या नावांवर मुंबईतील बैठकीत एकमत झाले आहे अशा उमेदवारांना तुम्ही अर्ज भरण्याची तयारी करा, असे निरोप महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष हे पक्ष नेतृत्वाकडे लागले आहे. ते कधी उमेदवारांची यादी जाहीर करतात याची वाट पाहत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे, त्यात महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडावे लागतेच, पण आर्थिक विषयक विवरणही तयार करावे लागते. त्यामुळे उमेदवारांनी आपल्याच तिकीट मिळेल या भरवशावर वकिलांच्या मदतीने अर्ज तयार ठेवले आहेत.

भाजपने काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल असे सांगितले होते. पण यादी जाहीर करण्याचे टाळण्यात आले आहे. पुणे शहरात महाविकास आघाडी तुटलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आता एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे जागा वाटपाची समीकरणे बदलणार आहेत.

PMC Election BJP
PMC Election 2025: 50 टक्के जागांचा तिढा सुटेना! मुख्यमंत्र्यांची बैठकही निष्फळ, उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी

भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, असे नाराज इच्छुक विरोधी पक्षात जाऊन बंडखोरी करू शकतात. पक्षातील नाराजांकडून उमेदवारी बदलासाठी पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणला जाऊ शकतो. याकारणांनी भाजपने लगेच उमेदवारी यादी जाहीर करणे टाळले आहे.

पण कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरूड, शिवाजीनगर या भागातील काही उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करा, अशा सूचना महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडूनही सोशल मीडियावरचा प्रचार तीव्र केला आहे. दरम्यान, काही उमेदवारांनी आमचे नाव अधिकृत जाहीर झाल्याशिवाय आम्ही उमेदवारी अर्ज भरणार नाही असे स्पष्ट केले आहे.

‘‘भाजपने कोणालाही उमेदवारी अर्ज भरा असे निरोप दिलेले नाहीत. उमेदवार अंतिम करण्यासाठीची आमची प्रक्रिया अजून सुरु आहे. भाजप उमेदवारांची यादी रविवारी दुपारनंतर जाहीर होऊ शकेल.’’

- राजेश पांडे, महामंत्री, प्रदेश भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com