Shankar Mandekar News: पुण्यात खड्ड्याने चिमुकल्याचा जीव घेतला : आमदार मांडेकरांकडून आधी जबाबदारीऐवजी वादग्रस्त वक्तव्य; आता ‘विपर्यास’ची सारवासारव

Pune News: म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर मंगळवारी (१८ ऑगस्ट) रोजी झालेल्या भीषण अपघातात विराज पाटोळे या बालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनावर आणि महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशात आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.
Malhunge Nande Road Accidents; NCP MLA Shankar Mandekar
Malhunge Nande Road Accidents; NCP MLA Shankar Mandekarsarkarnama
Published on
Updated on

Pune News: म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर मंगळवारी (१८ ऑगस्ट) रोजी झालेल्या भीषण अपघातात विराज पाटोळे या बालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनावर आणि महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशात आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार शंकर मांडेकर यांनी “रस्त्यांची परिस्थिती अशीच आहे, त्यामुळे अपघात होतात. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी आमदाराला जबाबदार धरता येणार नाही,” अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्यावरून अपघातात मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाबाबत आमदारांची भूमिका संवेदनशील नसल्याची टीका सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर आता आमदार शंकर मांडेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “म्हाळुंगे-नांदे रस्त्यावरील अपघातात झालेल्या बालकाच्या मृत्यूच्या घटनेसंदर्भात पत्रकारांशी मी जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला आहे. माझ्या विधानाचे राजकारण कुणीच करू नये,” असे मांडेकर यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचेही मांडेकर यांनी सांगितले. त्यानंतर प्रशासनाच्या पातळीवर चर्चा करून येत्या आठ ते दहा दिवसांत या भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

Malhunge Nande Road Accidents; NCP MLA Shankar Mandekar
Indian Womens News: देशातील महिलांचं नशीब पालटणार, 'अच्छे दिन' येणार, तब्बल 73 लाख कोटींच्या मालक बनणार...; अहवालातून मोठी अपडेट समोर

मांडेकर म्हणाले की, हिंजवडी, म्हाळुंगे तसेच माण परिसरातील पिण्याचे पाणी, रस्ते आणि वाहतूक कोंडी या समस्यांसाठी आपण विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहारही केला आहे.

या भागातील रस्त्यांची पूर्वीची रुंदी जेवढी आहे, तेवढीच आज वापरात आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. भूसंपादनाचा प्रश्न मिटल्यानंतर रुंदीकरणाचा प्रश्नही मार्गी लागेल आणि त्यातून वाहतूक कोंडीची समस्याही सुटेल, असे मांडेकर यांनी सांगितले.

Malhunge Nande Road Accidents; NCP MLA Shankar Mandekar
SIR revised schedule : महाराष्ट्रातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! SIR चे सुधारिक वेळापत्रक जाहीर, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले...

‘सर्व विभागांची संयुक्त बैठक घेणार’

या भागातील रस्ता चांगला, मजबूत आणि कायमस्वरूपी टिकाऊ करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे मांडेकर यांनी सांगितले.

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त कुटुंबाबाबत होत असलेल्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “माझी संवेदनशीलता लोकांना, जनतेला माहीत आहे. प्रत्येक संकटात मदतीसाठी मी पुढेच असतो,” असे मांडेकर म्हणाले. संबंधित कुटुंबाला जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच, “माझ्या विधानाचे राजकारण करून कुणीही विपर्यास करू नये,” असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com