

Pune News: राज्यामध्ये जरी भाजप आणि राष्ट्रवादी मित्र पक्ष म्हणून सत्तेत असले तरी भोरमध्ये मात्र या दोन्ही पक्षांमधील राजकीय वैर सातत्याने समोर येताना पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता भोरमधील छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे हे आमने-सामने आले आहेत.
थोपटे आमदार असताना या व्यापारी संकुलाचे काम सुरू झाले होते. मात्र शंकर मांडेकरांच्या काळात या वास्तूचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मी निधी देऊन हे काम पूर्ण केल्याचा दावा शंकर मांडेकर यांनी केला असून त्यानुसार त्यांनी या वास्तूचे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र त्यापूर्वीच संग्राम थोपटे यांनी या वास्तूचे उद्घाटन केले.
त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधला वाद आता विकोपाला पोहोचला असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमानंतर शंकर मांडेकर यांच्या हस्ते काल या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले, अनेक वर्ष सत्तेत असलेल्या लोकांनी इथं काहीच केलं नाही. आता या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनावरून वाद घातला जात आहे. या वास्तूचे भूमिपूजन जरी त्यांनी केलेले असले तरी गेल्या सहा वर्षापासून ही वस्तू धुळ खात पडली होती. आम्ही निधी देऊन ती पूर्ण केली.
या ठिकाणी बोर्डावर माझं नाव लावायचे नाही म्हणून काही लोक दमदाटी करीत होती. मी सरळ मार्गे माणूस आहे. पण तेवढाच वाकडा आहे. तुमची जी मस्ती आणि राजेशाही आहे ती घरी ठेवा. धमक असेल तर वेळ आणि ठिकाण सांगा तिथे येतो पण मस्ती केली तर मस्ती जिरवीन, आम्ही स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही. पण आमच्या अंगावर आला तर आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. इथून पुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा मांडेकरांनी थोपटे यांना दिला.
जो मस्ती दाखवत आहेत त्यांनी मुळशीमध्ये जाऊन शंकर मांडेकर हे काय कॅरेक्टर आहे ते पाहावं. काही असलं तरी आम्ही गरिबांना कधी त्रास दिला नाही. गोर गरिबांसाठी काम केले आहे. प्रेमाने वागा कोणाचं काय काम असेल तर सांगा काम केलं जाईल. पण मस्ती केली तर ती जिरवली जाईल मग तो कोणीही दादा असो वा त्याचा राजा असो कोणाच्या बापाला घाबरत नाही. असा थेट इशारा मांडेकरांनी विरोधकांना दिला.
भोरच्या विकासासाठी वर्षभराच्या कालावधीमध्ये पन्नास कोटी रुपये निधी आला आहे. अजून चार वर्षे जाणार आहेत या चार वर्षात भोरचा चेहरा मोरा बदलून टाकणार आहे. त्यामुळे विकास काम करणाऱ्यांच्या मागे लोकांनी उभा राहिला पाहिजे. जे लोक मटके, दारू धंदे यांना समर्थन देतात तुमच घोरबाडून घेतात त्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं मांडेकर म्हणाले.
आतापर्यंत मी कोणाच्या अंगावरती जात नव्हतो मात्र आता त्यांनी सुरुवात केली आहे. त्याचा शेवट मी करणार आहे. कारण यापूर्वी मी सांगितलं आहे. नाद करा आणि शंकर मांडेकरचा करू नका. कारण तुम्ही याला त्याला दादागिरी करत असाल तर मी थेट मुळाला हात घालणार आहे. मी फांद्यांना, पाचोळ्याला हात लावणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा मांडेकरांनी थोपटे यांना दिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.