Gaurav Ahuja arrested : पुण्यात भरदिवसा रस्त्यावर अश्लील चाळे करून फरार झालेल्या गौरव आहुजाला अटक ; माज उतरल्यावर आता म्हणातोय, की...!

obscene act on Pune road : पोलिसांनी गौरवला ताब्यात घेण्याआधीचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जाणून घ्या त्या व्हिडिओमध्ये नेमकं त्याने काय म्हटलं आहे?
gaurav ahuja
gaurav ahujasarkarnama
Published on
Updated on

Pune crime news : पुण्यात भररस्त्यात आणि भरदिवसा लघुशंका करून त्यानंतर स्थानिकांच्या नागरिकांना न जुमानता, अश्लील कृत्य करून नंतर आलिशान कारमधून पसार झालेला गौरव आहुजा अखेर पोलिसांना सापडला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मात्र पोलिसांच्या ताब्यात येण्याआधी त्याने एक माफी मागतानाचा स्वत:चा व्हिडिओ सोशल केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, ‘’मी गौरव आहुजा रा. पुणे. काल माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी एक कृत्य घडलं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस विभाग व शिंदे साहेबांची माफी मागतो आहे. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी..’’

gaurav ahuja
Pune Criem News : संतापजनक! रस्त्याच्या मधोमध गाडी थाबंवली, अश्लील चाळे केले; भरधाव वेगाने निघून गेला

 शिवाय त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राला याआधीच अटक करण्यात आलेली आहे. आता गौरवला देखील पुण्यात आणलं जाणार आहे आणि उद्या त्याची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या निमित्त गौरव आहुजा(Gaurav Ahuja) आणि त्याचे वडील यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

gaurav ahuja
Pune crime history : पुण्यात 1990च्या दशकापासून वाढत चाललेल्या गुन्हेगारीचा काळा इतिहास!

या गौरव आहुजाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तो अतिशय कृत्यांमध्ये समाविष्ट आहे. त्याचे वडीलही विविध गुन्हेगारी कृत्यांशी निगडीत आहेत. या गौरववर जुगाराचा, खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

पुण्यातील(pune) नामचीन गुंड सचिन पोटे याच्या गँगसोबत हा गौरव असतो. त्याला याआधी २०२१मध्ये अटक झाली होती. क्रिकेट सामन्यांवर तो त्याच्या सहकऱ्यांसह सट्टेबाजी करायचा. महाविद्यालयीन तरुणांना जुगारात अडकवून त्यांना कर्जबाजारी करून मग त्यांना ब्लॅकमेल केलं जायचं.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com