Pune Criem News : पोलिसांचा काही धाक राहिला आहे की नाही, असा संतप्त प्रश्न पुणेकर विचारत आहेत. कारण रस्त्याच्या मधोमध कार थांबवून मद्यधुंद अवस्थेमध्ये एका तरुणाने कारमधून उतरून लघुशंका केली. त्यानंतर कारमध्ये बसून अश्लील चाळे केले. त्याला जाब विचारल्यानंतर पुन्हा अश्लील चाळे करत आपली कार वेगाने पळवली. या सगळ्या प्रकराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा संतापजनक प्रश्न पुणेकर करत आहेत.
पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू करण्यात आला असून या घटनेबाबत पुण्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. अश्लील कृत्य करणारे तरुणाचे नाव गौरव आहुजा असे आहे. जाधव यांनी सांगितले की, सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. तरुणाच्या मागावेर पोलिस पथक गेले आहे. त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो सकाळी वाघोलीच्या दिशेने गेला होता.
गौरव आहुजा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्यांच्यावर तरुणाचे अपहरण करण्याचा गुन्हा दाखल आहे. गौरव आहुजा हा गाडीतून उतरला तेव्हा त्याच्या गाडीत आणखी एक तरुण बसलेला होता. त्याच्या हातामध्ये दारुची बाटील दिसत आहे. गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.
गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. गाडी माझ्यावर नावावर आहे त्यामुळे त्याच्यावर आणि माझ्यावर जी कारवाई होईल ती मान्य आहे.
गौरव आहुजा याच्या अश्लील कृत्याची माहिती मिळताच महिला काँग्रेस आक्रमक झाली. महिला काँग्रेसच्या नेत्यांनी थेट आहुजा यांचे हाॅटेल गाठत आंदोलन केले. तसेच पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.