Pune Mayor Election : मोठी बातमी! पुणे महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; फेब्रुवारीत 'या' तारखेला होणार फैसला!

Pune Mayor PMC BJP : महापालिका प्रशासनाकडून पहिली विशेष सभा बोलवण्यात आली आहे. त्यामध्ये महापौर पदाची निवड केली जाणार आहे.
Pune BJP
Pune BJP Sarkarnama
Published on
Updated on

Mayor Election Update : महपौर आरक्षणाच्या सोडतीनंतर पुणे महापालिका महापौर पदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. महापौर पदासाठी निवडणूक जानेवारी अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची तारीख समोर आली आहे. त्यानुसार 6 फेब्रुवारील महापौर पदाची निवडणूक होईल.

महापालिकेने विभागीय आयुक्तांना महापौर निवडी प्रक्रियेसंदर्भात पत्र पाठवले होते. त्यामुळे 26 जानेवारीनंतर दोन दिवसात ही प्रक्रिया राबवून महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाईल, असे बोलले जात होते. मात्र, विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर आता 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून 6 तारखेला पहिली विशेष सभा सकाळी होणार ११ वाजता बोलवण्यात आली आहे. या सभेत महापौरांची निवड करण्यात येणार आहे. महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.

Pune BJP
Nashik Deputy Mayor : नाशिकमध्ये महापौरपद महिलेला, उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवकांनी धरला वेगळाच हट्ट

भाजपकडून कोणाला संधी?

भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता असणार आहे. तर, विरोधी पक्ष नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अनुभवी नेत्याला संधी देणार असल्याची चर्चा आहे. तर, उपमहापौर पदासाठी गणेश बीडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांची नावे चर्चेत आहे

Pune BJP
Maithili Tambe Sangamner Mayor : पहिल्याच बैठकीत नगराध्यक्षा तांबेंचा धडाका! मोठा निर्णय, मानधन नकोच, नगरपालिकेच्या थेट उत्पन्न वाढीचा अजेंडा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com