

Pune PMC Mayor : महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (22 जानेवारी) पार पडली. यात सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेमध्ये महिलाराज येणार हे निश्चित झाले आहे. पुण्यासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे.
पुणे महापालिकेत भाजपने 165 पैकी 119 जागा जिंकल्या असून एकहाती सत्तास्थापन होणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये पुणे महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने मुक्ता टिळक यांच्या रुपाने महिला चेहरा दिला होता. आता पुन्हा महापालिकेतील भाजपची कमान जवळपास 6 वर्षांनी पुन्हा महिलेच्या हाती येणार आहे.
दुसऱ्या बाजूला सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने महापौरपदाची आस लावून बसलेल्या अनेक दिग्गज पुरुष नेत्यांचा हिरमोड झाला आहे. यात माजी सभागृह नेते गणेश बिडकर, शहरप्रमुख धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर यांचा पत्ता कट झाला आहे. आता त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजपने बॅकअप प्लॅन तयार ठेवला असल्याचे सांगितले जाते.
आता बिडकर, घाटे, भिमाले आणि शिळीमकर या नेत्यांतील एखाद्याच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एखाद्या नेत्याला स्थायी समितीचे अध्यक्षपद, एकाला सभागृह नेतेपद आणि एकाला शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.
महापौरपदावर ब्राह्मण चेहरा दिल्यास उपमहापौपदावर प्रवर्गातील चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. महापौरपदावर प्रवर्गातील चेहरा दिल्यास उपमहापौपदावर ओपन प्रवर्गातील चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी स्थायी समिती आणि शहर सुधारणा समितीसाठीही जातीय समतोल साधावा लागण्याची कसरत भाजपला करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.