Shiv Sena UBT and MNS - 'मुंबई जर एकत्र होत असेल तर पुणे का नाही?' म्हणत पुण्यात उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी चढली 'मनसे' कार्यालयाची पायरी!

Pune Shivsena UBT and MNS News - मुंबईतील मोर्चासाठी पुण्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांची संख्या जास्त कशी असेल यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली
Pune Shivsena UBT and MNS leaders
Pune Shivsena UBT and MNS leaders sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT and MNS leaders meeting in Pune for Mumbai protest -शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषा सक्ती विरोधात राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. मुंबईतील मोर्चा निमित्त हे दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचा उत्साह पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. या निमित्ताने पहिल्यांदाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुण्यातील नेत्यांनी मनसे कार्यालयाची पायरी चढल्याचंही पाहायला मिळालं.

पाच जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने आज(शनिवार) पुण्यातील मनसे कार्यालयात दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांमध्ये औपचारिक चर्चा झाली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या या औपचारिक बैठकीत पुढील एक-दोन दिवसांत दोन्ही पक्षातील वरिष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

याप्रसंगी बोलताना संजय मोरे म्हणाले, राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलं उद्धव ठाकरेंनी दोन पावले पुढे टाकली आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही नेते आता एकत्रित आले आहेत. मनसेचे संदीप देशपांडे आणि वरून सरदेसाई यांनी मुंबईमध्ये एकत्रित बैठक घेतली, या बैठकीमध्ये पाच तारखेच्या मोर्चा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये पुणे देखील सामील आहे. पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी तयारी कशी केली जावी यासाठी साईनाथ बाबर त्यांची टीम मी आणि माझी टीम एकत्रित बसलो आणि पुण्यातून एकत्रिकरण कसं केलं जावं यासंदर्भात चर्चा झाली.

Pune Shivsena UBT and MNS leaders
Sujay Vikhe - Video : ''लोकसभेतील पराभव हे माझं अपयश नाही, तो दोष...'' ; सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं!

या मोर्चासाठी पुण्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांची संख्या जास्त कशी असेल यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली, उद्या सुद्धा या संदर्भात एक बैठक होणार आहे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी तसेच महाराष्ट्रावर लादली जात असणाऱ्या हिंदी भाषेच्या विरोधात जो मोर्चा होत आहे. त्यासाठी दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र रस्त्यावर उतरत आहेत त्यात पुणे देखील मागे नाही, आम्ही सुद्धा एकत्र आहोत आणि मुंबईतील मोर्चासाठी एकत्रच जाणार आहोत. मुंबई जर एकत्र होत असेल तर पुणे का नाही? असं संजय मोरे म्हणाले.

Pune Shivsena UBT and MNS leaders
CJI Bhushan Gavai - 'कलम 370' बाबत सरन्यायाधीश गवईंनी मांडलं स्पष्टच मत; 'या' पक्षाची होणार अडचण!

तर मनसेचे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये प्रचंड मोठा मोर्चा होणार आहे त्या संदर्भात एकत्रित जाण्यासंदर्भात चर्चा झाली. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाने फार मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे काम करत आहेत. पालिका निवडणुकीबाबत भविष्यात काय होईल हे आता सांगता येणार नाही, आज मात्र एका विचाराने काम करत आहोत आणि एकत्र आलेच तर सर्वांनाच आनंद होईल. असं साईनाथ बाबर म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com