Alandi Metro Extension : माऊलींच्या भक्तांसाठी खुशखबर! पुण्याची मेट्रो आळंदीपर्यंत आणण्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन

Murlidhar Mohol On Pune Metro Project : महायुती सरकारच्या पुढाकाराने पुण्यातील मेट्रोच्या कामांने चांगलीच गती घेतल्याचं दिसत आहे. शिवाय पुणे मेट्रो हा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जातं. याच मेट्रोचा लाभ आता आळंदीकरांना देखील घेता येणार आहे.
Murlidhar Mohol
Union Minister Murlidhar Mohol assured that Alandi will be connected to Pune Metro soon, reducing traffic congestion and benefiting devotees.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 26 Aug : महायुती सरकारच्या पुढाकाराने पुण्यातील मेट्रोच्या कामांने चांगलीच गती घेतल्याचं दिसत आहे. शिवाय पुणे मेट्रो हा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जातं. याच मेट्रोचा लाभ आता आळंदीकरांना देखील घेता येईल, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, आळंदीला येताना भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता शहरातील वाहतुकीची वाढती कोंडी लक्षात घेता पुणे-आळंदी मेट्रोची गरज जाणवत आहे.

तर पुण्यात मेट्रोचे काम गतीने सुरू आहेत. पुण्यात चालू असून कळस-धानोरी मेट्रो डीपीआर मंजूर झाला आहे. यामध्ये आळंदीचा समावेश केला जाईल आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने हा प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता माऊली भक्तांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे 22 किलो वजनाचा सुवर्ण कलशारोहण करण्यात आले. सुवर्ण कलशासमवेत उभारलेल्या ध्वजाचे पूजन मोहोळ यांच्या हस्ते रविवारी (ता. 24) करण्यात आले. यावेळी त्यांनी आळंदीपर्यंत मेट्रो आणण्याचं आश्वासन दिलं.

Murlidhar Mohol
Vanatara SIT Probe : 'बेकायदा पद्धतीने...'; कोल्हापुरकरांच्या 'माधुरी'ला नेणाऱ्या 'वनतारा'ला सुप्रीम कोर्टाचा दणका : 'त्या' आरोपांनंतर SIT चौकशी करण्याचे आदेश

ते म्हणाले, "आजूबाजूचा परिसर मोठा विस्तारत चालला आहे. कमी दिवसात सर्वाधिक प्रमाणात नागरीकरण होत आहे, लोकसंख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने अनेक नागरिक प्रश्न व वाहतूक प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा न येता थेट आळंदीला कसे येत येईल, असा भाविक विचार लोक करत आहेत.

Murlidhar Mohol
Devendra Fadnavis : आईबद्दल अपशब्द अन् आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप; टोकाची टीका करणाऱ्या जरांगेंबाबत अखेर CM फडणवीसांनी मौन सोडलं

तर पुण्यात मेट्रोचे काम चालू आहे. कळस धानोरी मेट्रो डीपीआर मंजूर झाला आहे. त्यामध्ये आळंदीचा समावेश असणार आहे. देवस्थानचा ज्ञानपीठाचा ही विचार मुख्यमंत्री यांनी जाहीर केला आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com