PMC Election : पुण्यात आजी-माजी आमदारांचा महापालिकेवर डोळा; नगरसेवकपद घरातच ठेवण्यासाठी सेटिंग सुरु

PMC Election : पुणे महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यासह शहरातील आजी-माजी आमदार, खासदार यांच्या कुटुंबीयांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.Sarkarnama
Published on
Updated on

PMC Election News : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार (11 नोव्हेंबर) आरक्षण सोडत जाहीर झाली. या आरक्षणामुळे अनेक राजकीय बदल होणार आहेत. काही नेत्यांसाठी सोयीचे आरक्षण पडले आहे, तर काहींना या आरक्षणाचा राजकीय फटकाही बसणार आहे. याच आरक्षण सोडतीनंतर पुण्यातील डझनभर आजी-माजी आमदारांच्या आणि खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबामध्ये महापालिकेचे वेध लागले आहेत. कोणाची पत्नी, कोणाची मुले तर कोणाचे आणखी कोण निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. थोडक्यात, नगरसेवकपद घरातच ठेवण्यासाठी धडपड सुरु आहे.

प्रभाग क्रमांक १ (कळस-धानोरी) आमदार होण्यासाठी इच्छुक असलेले आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांची भावकी पण विरोधक असलेले भाजपचे अनिल टिंगरे इथून पुन्हा हॅट्रिकच्या तयारीत आहेत. प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर-नागपूर चाळ) इथून सुनील टिंगरे यांचे भाऊ सुहास टिंगरे मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे. प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-लोहगाव) या प्रभागातून ड जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे मागील काही वर्षांपासून तयारी करत आहेत.

प्रभाग क्रमांक ४ (खराडी-वाघोली) इथून ड जागा खुली आहे. इथे बापूसाहेब पठारे यांचे भाचे संतोष भरणे यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ५ (कल्याणीनगर - वडगाव शेरी) इथे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ माजी नगरसेवक योगेश मुळीक यांच्यासाठी सोईचे आरक्षण पडले आहे. ते यावेळी हॅट्रिकच्या तयारीत आहेत.

After the PMC reservation draw, families of top Pune leaders gear up for the upcoming civic elections.
NCP Politics : राष्ट्रवादीची नवी यादी जाहीर; प्रवक्तेपदावरून डावललेल्या मिटकरींना पुन्हा बोलण्याचा अधिकार, ठोंबरेंना लांबच ठेवले

प्रभाग क्रमांक १७ (रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी) मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांचा मुलगा इशान तुपे यांना संधी मिळू शकते. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील कांबळे यांची मुलगी सुप्रिया कांबळे या प्रभाग क्रमांक २० (शंकर महाराज मठ-बिबवेवाडी) किंवा प्रभाद क्रमांक २१ (मुकुंदनगर-सॅलसबरी पार्क) या दोन्ही पैकी एका ठिकाणहून निवडणुकीत नशीब आजमावू शकतात.

प्रभाग २३ (रविवार पेठ-नाना पेठ) इथली ब जागा, प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल) अ जागा ओबीसी महिला आरक्षित झाली आहे. यापैकी एका आरक्षित जागेवरून धंगेकर यांच्या पत्नी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रभाग २३ मधील क किंवा ड, प्रभाग २४ मधील ब किंवा ड इथूनही धंगेकर यांच्या पत्नीच्या उमेदवारीची चर्चा आहे. सोबतच प्रभाग २४ मधील ड जागेवरून प्रणव धंगेकर विरुद्ध भाजपचे गणेश बिडकर अशी लढत होऊ शकते.

प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ -महात्मा फुले मंडई) इथून दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या यांच्या सुनबाई स्वरदा बापट इच्छुक आहेत. शिवाय दिवंगत माजी आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र देखील यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याचं सांगितलं जात आहे.दोघेही अनुक्रमे क आणि ड जागेवरून उमेदवार असू शकतात. पर्वतीच्या आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण मिसाळ हे देखील प्रभाग क्रमांक २० (शंकर महाराज मठ-बिबवेवाडी) किंवा प्रभाग क्रमांक २८ (जनता वसाहत-हिंगणे खुर्द) इथून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाग क्रमांक ३१ (कोथरूड -मयूर कॉलनी) १ जागा मागास प्रवर्गासाठी, २ साधारण महिला व १ जागा खुल्या गटासाठी सुटली आहे. इथून खुल्या जागेवरून मोहोळ यांचा पुतण्या दुष्यंत मोहोळ यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय माजी आमदार शशिकांत सुतार यांचा मुलगा पृथ्वीराज सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा पुतण्या योगेश मोकाटे हे देखील महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या कुटुंबातून देखील २ सदस्य निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. टिळेकर यांच्या आई आणि भाऊ हे प्रभाग क्रमांक ३८ आणि ४० मधून रिंगणात असू शकतात. एकूण काय तर प्रत्येक आजी-माजी आमदारांची आपल्याच घरातून महापालिकेचा कारभार कसा चालेल याकडे जोर असल्याचे दिसून येते. यामुळे निष्ठावंत आणि इतर कार्यकर्त्यांनाही त्यांचा पत्ता कट होण्याची भीती सतावत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com