NCP Pune News : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची 'गट्टी' जमणार? माजी महापौरांच्या गुप्त भेटीमुळे चर्चांना उधाण!

Pune Municipal Corporation Is NCP Alliance Forming : पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची संभाव्य गट्टी आणि माजी महापौरांच्या गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. ताज्या घडामोडी वाचा.
PMC
PMCSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन भाजपला रोखावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असून त्यासाठी नेत्यांवर प्रचंड दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील दोन माजी महापौरांनी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्याशी गेल्या आठवड्यात सुमारे दीड तास बंद दारात बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवली गेली असली तरी पक्षांतर्गत वर्तुळात तिची जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या आघाडी बाबत फारसे सकारात्मक नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढणार आहोत. काँग्रेसचे पुणे प्रभारी सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याशी याबाबत आमचे बोलणे अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहिल आणि पुण्यातही तेच चित्र दिसेल.”

दुसरीकडे, अजित पवार गटातील अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी मात्र एकटे लढण्याच्या मनःस्थितीत नाहीत. भाजपने त्यांना सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस-ठाकरे गटाने अजित पवारांना घेण्यास देण्यास कडवा विरोध केला आहे. परिणामी अजित गटासमोर मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

PMC
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : 'जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत...', भरसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला लाडक्या बहिणींना शब्द

अजित पवारांना पुण्यातील नेत्यांना स्वबळावरती निवडणूक लढण्याची तयारी सुरू करा अशा सूचना दिल्या आहेत. मात्र स्थानिक नेत्यांचं भाजप नाही तर किमान शरद पवार गटाशी समेट करा” असा रेटा आहे. तेच शरद पवार गटातील काही बड्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडेही "पुणे तरी एकत्र लढूया, भाजपला रोखणे गरजेचे आहे" अशी विनंती केली आहे.

PMC
Raksha Khadse : एकनाथ खडसेंच्या सूनबाईंनी बोलून दाखवली 'मनातील खदखद'; म्हणाल्या,'दोघांच्या वादामुळे माझं...'

मात्र दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते (शरद पवार आणि अजित पवार) हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवून माघार घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता पुण्यातील स्थानिक समीकरण आणि कार्यकर्त्यांचा दबाव यांच्यावरच दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य आघाडीचे भविष्य अवलंबून आहे.

सध्या तरी चेंडू पुण्यातील दोन्ही गटांच्या स्थानिक नेत्यांच्या कोर्टात आहे; पण तो कोर्टातून बाहेर पडणार की आतूनच आऊट होणार, हे पुढच्या १५-२० दिवसांत स्पष्ट होईल, असे बोल जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com