
Pune News : गणेशोत्सव काळामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील पायाभूत सुविधांचा आढावा आणि समस्यांची पाहणी आमदार हेमंत रासने यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील मध्यवर्ती भागाच्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आगामी काळात काही मोठी पावलं उचलणार असल्याचे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. या पुणे दौऱ्या दरम्यान शहरातील वाहतूक कोंडीबाबत बोलताना त्यांनी शहरांमध्ये भविष्यामध्ये रस्ते वाढवणे शक्य नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे भविष्याचा विचार करता भुयारी मार्गांचा जाळ मध्यवर्ती भागामध्ये उभारले जाणार असल्याचं सुतोवाच केलं होतं. त्याच दृष्टिकोनातून आता महापालिकेने देखील पावलं टाकण्यात सुरुवात केली असल्यास पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishor Ram) म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात भुयारी मार्गांची उभारणी प्राधान्याने करण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या येणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्वरित करता येणाऱ्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन नियोजन या दोन्ही पातळ्यांवर काम सुरू आहे. रखडलेली रस्त्यांची कामे वेगात पूर्ण करणे, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. येत्या वर्षभरात याचे सकारात्मक परिणाम नागरिकांना दिसून येतील असं नवल किशोर राम म्हणाले.
आगामी काळामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भुयारी मार्गांचा जाळं उभारून वाहतूक वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्याबाबत प्रशासनाकडून कारवाई करण्याची देखील सुरुवात करण्यात आली असल्याचं नवल किशोर राम यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगभरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून मान्यता देण्यात आली. यंदा हा उत्सव आणखीन भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी पायाभूत सुविधा सुसज्ज असणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्यासोबत आढावा घेण्यात आला. कसबा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांच्या प्रस्तावावर राज्य सरकार सकारात्मक असून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.