PMC Election : मारणेनंतर आंदेकरांच्या कुटुंबालाही राष्ट्रवादीचा एबी फॉर्म : अजितदादांकडून शेवटच्या दिवशी दोन गुंडांच्या घरात तिकीट

Pune Murder Case NCP Candidates : सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी तुरूंगातून महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. त्या प्रभाग क्रमांक 23 मधून ही निवडणूक लढवणार आहेत.
Sonali and Laxmi Andekar, currently lodged in jail in the Ayush Komkar murder case, file PMC election nomination after receiving NCP ticket in Pune.
Sonali and Laxmi Andekar, currently lodged in jail in the Ayush Komkar murder case, file PMC election nomination after receiving NCP ticket in Pune.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 30 Dec : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी तुरूंगातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. त्या प्रभाग क्रमांक 23 मधून ही निवडणूक लढवणार आहेत. नुकतंच न्यायलायाने त्यांना निवडणूक लढवण्यासाठी परवानगी दिली होती.

मात्र, त्यांना कोणता राजकीय पक्ष उमेदवारी देणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अखेर राष्ट्रवादीने हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय राष्ट्रवादी पक्षाने पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना देखील उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे एकीकडे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे अशा आरोपींना उमेदवारी देणं कितपत योग्य आहे? असा सवाल पुणेकर विचारत आहेत. दरम्यान, नुकतंच बंडू आंदेकर देखीलपुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष अर्ज भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत तो मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आला होता.

Sonali and Laxmi Andekar, currently lodged in jail in the Ayush Komkar murder case, file PMC election nomination after receiving NCP ticket in Pune.
Ajit Pawar: गुन्हेगारी संपवा म्हणणाऱ्या अजितदादांनी दिली गुंडाच्या पत्नीला उमेदवारी; जयश्री मारणे या प्रभागातून लढणार

मात्र, अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरून घेतला नसल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता अशातच त्याच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांना महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली असून आता आंदेकरांच्या वकिलांच्या मार्फत AB फॉर्म भरण्यात आले आहेत. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल त्यांनी दाखल केला आहे. तर दुसरीकडे आयुष कोमकरच्या आईने देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. कल्याणी यांनी नाना पेठ प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com