Pune BJP: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी लावला जोर, काही मुलाखती एका मिनिटात उरकल्या तर काही पाच मिनिटांपर्यंत...

PMC Election 2025: पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपमध्ये प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुक, त्यातील योग्य उमेदवार शोधण्यासाठी आजपासून (ता. 13) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात झाली आहे.
BJP  election
BJP electionsarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपमध्ये प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुक, त्यातील योग्य उमेदवार शोधण्यासाठी आजपासून (ता. १३) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात झाली आहे. काहींच्या मुलाखती एका मिनिटात उरकल्या तर काहींच्या पाच मिनिटांपर्यंत मुलाखत झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होताच, पण उमेदवारी मिळणार की नाही याविचाराने अस्वस्थताही दिसून आली. या मुलाखतीसाठी शहर कार्यालयाबाहेर दिवसभर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने (BJP) इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेतले आहेत. त्यांच्या शनिवारी (ता.13) मुलाखती शहर कार्यालयात पार पडल्या. शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आज दिवसभरात प्रभाग क्रमांक 1 ते 20 यामधील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत.

सकाळपासून मुलाखतीला सुरुवात झाल्यानंतर शहर कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने वेळ वाया न जाऊ देता या चारीही पदाधिकाऱ्‍यांनी स्वतंत्रपणे प्रभागनिहाय मुलाखती चालू केल्या, मुलाखतीला जाण्यासाठीही मोठी रांग कार्यालयात लागली होती. एकाच प्रभागातील इच्छुक एकमेकांच्या समोर आले आल्याने काहीसे वेगळे वातावरण याठिकाणी पाहायला मिळाले.

BJP  election
Raju Shetti News: राजू शेट्टींचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गंभीर आरोप; म्हणाले,'मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर..'

मुलाखतीमध्ये पक्षाचे किती वर्षापासून काम करत आहेत, संघटनात्मक जबाबदारी काय पार पाडली आहे, सामाजिक क्षेत्रात काय काम केले आहे, शिक्षण, व्यवसाय याची माहिती इच्छुक उमेदवारांना विचारण्यात आली. अनेक इच्छुकांनी मुलाखतीमध्ये कार्य अहवाल सादर केल्याने मुलाखत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची सोय केली. त्याचप्रमाणे इच्छुकांनी त्यांच्या जमेच्या बाजू मुलाखतीत मांडल्या, तर त्यांच्या कमकुवतपणाबद्दल विचारल्यानंतर अनेकांची चांगलीच धांदल उडाली.

प्रवेश लांबल्याने मुलाखतही लांबली

महापालिकेच्या निवडणुकीच्या (PMC Election) तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यासह अन्य पक्षातून काही इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण गेल्या आठवड्यात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षप्रवेशावरून दोन नेत्यांमध्ये वाद झाले. त्याचे पडसाद उमटल्याने पक्ष प्रवेश लांबणीवर पडले आहेत.

BJP  election
Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री फडणवीसांचा अजितदादांना मोठा धक्का ? पुण्यातील आणखी एका मोठ्या जमीन व्यवहाराला स्थगिती

त्यामुळे अशा इच्छुकांच्या मुलाखती या स्वतंत्रपणे गुपचूप पार पाडल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, संभावित प्रवेश हे ज्या प्रभागात होणार आहेत, तेथील कार्यकर्त्यांमध्ये आज अस्वस्थता दिसून येत होती.

‘‘आज दिवसभरात प्रभाग क्रमांक 1 ते 20 मधील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. उद्या प्रभाग क्रमांक 21 ते 41 मधील इच्छुकांच्या मुलाखती पार पाडल्या जाणार आहेत. या मुलाखतीसाठी कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.’’

- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com