Pune municipal election : पुण्यात भाजप उमेदवारांवर निवडणुकीपूर्वीच गुलाल: एकाच प्रभागातून 2 जण बिनविरोध नगरसेवक

BJP Pune News : पुण्यातील भाजपच्या दोन उमेदवारांवर निवडणुकीपूर्वीच गुलाल पडला असून एकाच प्रभागातून 2 जण बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात आतापासूनच जल्लोष केला जात आहे.
Manjusha Nagpure, Shrikant Jagtap
Manjusha Nagpure, Shrikant Jagtap Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यभरात 29 महापालिका निवडणुकांसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पुणे महापालिकेच्या 41 प्रभागांतील 165 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपच्या दोन उमेदवारांवर निवडणुकीपूर्वीच गुलाल पडला असून एकाच प्रभागातून 2 जण बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात आतापासूनच जल्लोष केला जात आहे.

राज्यभरातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांचे टेन्शन वाढले होते. पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 35 मधील भाजपच्या (BJP) दोन उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे दोन जण बिनविरोध विजयी झाले. निवडणुकीपूर्वीच हे दोघेजण विजयी झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.

Manjusha Nagpure, Shrikant Jagtap
Panvel municipal election: महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का : एकाचवेळी गठ्ठाभर उमेदवारांची माघार, भाजपचे 7 जण बिनविरोध

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. मुदत संपण्यापूर्वी पुण्याच्या सिंहगड रोड भागातून भाजपच्या दोन नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा त्या निवडणूक लढवत होत्या.

Manjusha Nagpure, Shrikant Jagtap
BJP Damage Control : '...तर उत्तर भारतीय महापौर असेल', कृपाशंकर सिंहांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोल, सगळे पत्ते ओपन केले!

प्रभाग क्रमांक 35 ड सर्व साधारण या गटातून भाजपचे श्रीकांत शशिकांत जगताप हे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील नितीन गायकवाड यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे भाजपचे श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले आहेत.

Manjusha Nagpure, Shrikant Jagtap
Shivsena Vs BJP : CM फडणवीसांचेही ऐकले नाही... भाजपनेच युती तोडली! आता भोगा, संजय शिरसाट यांनी सुनावले!

पुणे महापालिकेतील 41प्रभागांतील 165 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच दोन उमेदवार बिनविरोध आल्याने भाजपने विजयी सलामी दिली आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेत भाजपची सत्ता होती. या निवडणुकीतही भाजपने विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या या चुरशीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manjusha Nagpure, Shrikant Jagtap
NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही आयडिया कोणाची? प्रस्ताव कोणी दिला? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com