NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा, पहिल्याच दिवशी अर्ज संपले, 10 हजार घेऊन...

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांची मोठी संख्या आहे. पहिल्याच दिवशी पक्षाचे उमेदवारी अर्ज संपले.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसून आली. पक्षाने उपलब्ध करून दिलेले सर्व अर्ज पहिल्याच दिवशी संपले आहेत. या अर्जांसाठी पक्षाने शुल्क देखील आकारले होते. तरी देखील इच्छुकांचा उत्साह काही मावळला नाही अर्ज संपल्याने अनेकांना मोकळ्या हाताने परत जावे लागले.

नुकतीच महापालिकेकडून प्रभागाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. काही प्रभागांमध्ये आरक्षण सोयीस्कर ठरल्याने इच्छुकांना संधी मिळाली आहे. शहरात महाविकास आघाडीतून भाजपला रोखण्यासाठी लढा देण्याचा पक्षाचा निर्धार असल्याने उमेदवारांमध्ये उत्साह वाढल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज घेण्यासाठी 10 हजारांचे शुल्क आकारले होते.

महापालिकेच्या मागील निवडणुका 2017 मध्ये झाल्या होत्या. मार्च 2022 मध्ये निवडणुका अपेक्षित होत्या. परंतु, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या पुढे ढकलल्या गेल्या. आता न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना निश्चित केली. दोन दिवसांपूर्वी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रभागांची स्थिती आणि ताकद स्पष्ट झाली आहे.

NCP Sharad Pawar
Congress Politics : बिहारमध्ये धक्का बसताच काँग्रेसचा महाराष्ट्रात मोठा निर्णय, ठाकरेंची साथ सोडली! स्वबळावर लढण्याचा नारा!

पक्षफुटीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह...

2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना पक्षाचे 42 नगरसेवक निवडून आले होते. त्या वेळी मोदी लाटेमुळे भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले आणि मनसे व काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. मनसेचे नगरसेवक 28 वरून 2 वर, तर काँग्रेसचे नगरसेवक 27 वरून 10 वर खाली आले. मात्र, राष्ट्रवादीला फक्त 8 ते 10 जागांचा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर राज्यातील सत्ता समीकरण बदलले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले.

नवीन चेहऱ्यांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजित पवारांकडे, तर दुसऱ्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव मिळाले. 44 पैकी 38 हून अधिक नगरसेवक अजित पवारांच्या गटात गेल्याने शरद पवार गटात दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांना संधी निर्माण झाली. त्यामुळे या पक्षातून निवडणूक लढण्यास इच्छुकांची संख्या वाढल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अर्जासाठी 10 हजार शुल्क

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर पक्षाकडून 300 अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते मात्र पहिल्याच दिवशी तब्बल 300 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्याची माहिती पक्षाने दिली. ओपन मधून अर्ज घेणाऱ्यांना 10 हजार अर्ज शुल्क आकारण्यात आला असून आरक्षित जागांसाठी 5000 शुल्क आकारण्यात आला आहे. आणखी इच्छुकांसाठी अतिरिक्त अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com