PMC Election update : मोहोळ आणि बिडकरांनी वाटोळे करण्यासाठी हे केलं, आता भीतीपोटी पोलीस बंदोबस्त! पवारांच्या शिलेदाराचा थेट वार...

Pune Municipal Election Ward Restructuring Updates : प्रशांत जगताप म्हणाले, माझ्या सहा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच मी 2 दिवसांमध्ये हरकती, सूचना संपवण्यात येत असल्याचं पाहत आहे.
Prashant Jagtap addressing media while criticizing BJP leaders Murlidhar Mohol and Ganesh Bidkar over Pune municipal election ward restructuring.
Prashant Jagtap addressing media while criticizing BJP leaders Murlidhar Mohol and Ganesh Bidkar over Pune municipal election ward restructuring.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे महापालिका निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर नोंदविण्यात आलेल्या हरकती, सूचनांची आज सुनावणी होत आहे. यंदाच्या प्रभाग रचनेवर विरोधकांसह भाजप वगळता महायुतीतील मित्रपक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला फायदेशीर अशी प्रभाग रचना बनवण्यात आल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवर तब्बल सहा हजार हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

आज हरकती, सूचनांवर बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी होत असताना मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसंच सुनावणी दरम्यान येणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात बंधनं घालण्यात आली आहेत. यावरून आता विरोधी पक्ष आणखीनच आक्रमक झाले आहेत.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, माझ्या सहा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच मी 2 दिवसांमध्ये हरकती, सूचना संपवण्यात येत असल्याचं पाहत आहे. ज्या शहरात 41 प्रभाग आहेत. त्या शहरात सुनावणीसाठी पाच दिवस द्यायला हवे होते. मात्र आता फक्त दिखावा म्हणून सुनावणीचं काम केलं जात असल्याचा आरोप जगताप यांनी केला.

Prashant Jagtap addressing media while criticizing BJP leaders Murlidhar Mohol and Ganesh Bidkar over Pune municipal election ward restructuring.
Rahul Gandhi News : CRPF कडून मल्लिकार्जून खर्गेंना पत्र; राहुल गांधींची केली तक्रार, गंभीर मुद्दा आणला समोर...

मी 2002 पासून आतापर्यंत सात प्रभाग रचनांच्या सुनावणीसाठी उपस्थित राहिलो आहे. मात्र आत्तापर्यंत एकदाही प्रशासकीय अधिकाऱ्याला पोलीस संरक्षणाची गरज पडली नव्हती. मात्र आजच्या सुनावणीला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कदाचित आत्तापर्यंत प्रशासनाने कधी ही उथळपणाने प्रभागरचना केली नव्हती. त्यामुळे विरोधकांची किंवा नागरिकांची त्यांना भीती वाटत नसावी. मात्र झालेल्या प्रभाग रचनेमुळे त्यांना भीती वाटत असल्याचं प्रशांत जगताप म्हणाले. 

Prashant Jagtap addressing media while criticizing BJP leaders Murlidhar Mohol and Ganesh Bidkar over Pune municipal election ward restructuring.
VP Election Result : समझने वालों को इशारा काफी है! उपराष्ट्रपती निवडणुकीत बदनामी महाराष्ट्राचीच…

केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ तसेच भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आणि एकूणच भाजपने सर्व राजकीय पक्षांचे वाटोळे करण्यासाठी ही प्रभाग रचना केलेली आहे. पुण्यात काही विकास कामे केली नसल्यामुळे पुणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जाऊ लागू नये, आपल्या पक्षाची अवस्था वाईट होऊ नये, यासाठी चुकीची प्रभाग रचना केली आहे. त्याची फार आरडाओरड होऊ नये, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाने प्रशासनाला घेराव घालू नये, या भीतीपोटी सूचनांचा सुद्धा मज्जाव केला जात आहे. त्यामुळे ही प्रभाग रचना भाजपचा दबावपोटी झालेली आहे, यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचे प्रशांत जगताप म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com