Murlidhar Mohol : '...तर महापालिका निवडणुकीत देखील तुमचं बिहार होईल'; केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा विरोधकांना इशारा

Pune Municipal Elections : 'दुबार मतदार, चुकीच्या मतदार याद्या याबाबत ज्यांनी कोणी भूमिका मांडली असेल त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. पण यांचे राजकारण होता काम नये, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकी वेळी हीच परिस्थिती असायची स्थानिक निवडणुकांपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये कधीही मतदार यादी अपडेट नव्हत्या.'
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 Nov : आगामी महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत.

तसेच मोठ्या प्रमाणात दुबार नाव देखील मतदार याद्यांमध्ये असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, केंद्र सरकारने नव्या दोन मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे. पुणेकरांसाठी आनंदची बातमी आहे.

मेट्रो दोन मार्गिका मंजूरी मिळाली आहे. खराडी-हडपसर स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम सुरू होईल. ९ हजार ७५७ कोटी रुपये प्रकल्प खर्च आहे. पुढच्या पाच वर्षात हे काम पूर्ण होईल तसेच शिवाजीनगर-हिंजवडी लवकरच प्रवासी वाहतूक देखील सुरू होणार आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी १ हजार ई-बसला देखील मंजुरी दिली आहे. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होईल असं मोहोळ म्हणाले.

Murlidhar Mohol
Maharashtra Politics : 'शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती...'; भाजप-शिंदेसेनेत धुसफूस सुरू असतानाच शशिकांत शिंदेंनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मोहोळ यांना मतदार यादीतील चुकांबाबत विरोधक करत असलेल्या आरोपांबाबत विचारला असता मोहोळ म्हणाले, दुबार मतदार, चुकीच्या मतदार याद्या याबाबत ज्यांनी कोणी भूमिका मांडली असेल त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. पण यांचे राजकारण होता काम नये, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकी वेळी हीच परिस्थिती असायची स्थानिक निवडणुकांपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये कधीही मतदार यादी अपडेट नव्हत्या.

मतदार याद्या या अपडेट झाल्या पाहिजेत त्यामध्ये कोणतीही चूक अथवा दुबार नाव नसली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. परंतु याबाबतीत राजकारण करू नये कारण राजकारण केल्यास बिहारमध्ये जे घडलं तेच इकडे देखील घडेल. बिहारच्या जनतेने ते दाखवून दिलं आहे. वोट चोरी, मतदानामध्ये गोंधळ यासारख्या गोष्टी बिहारच्या निवडणुकीत विरोधी पक्ष करत राहिले आणि त्याचाच उत्तर जनतेने त्यांना दिलं.

Murlidhar Mohol
Beed Crime Video : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील राम खाडेंवर जीवघेणा हल्ला; सत्तूर, बंदूक घेऊन 10 ते 12 जण आले अन्...

कारण या गोष्टी वर्षानुवर्ष होत आल्या आहेत. आम्ही त्याचं राजकारण केलं नाही, या याद्या अपडेट दुरुस्त झाल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आता विरोधकांकडे टीका करायला काही राहिले नाही. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने विरोधक दास्तावले आहेत.

आपण हरणार आहोत अशी त्यांची मानसिकता तयार झाली असून त्या मानसिक ते मधूनच अशा काही गप्पा मारल्या जात असल्याचा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत कोर्टाचा निर्णय शुक्रवारी येणार आहे. याबाबत विचारला असता मोहोळ म्हणाले,महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका वेळेत होतील असं वाटत आहे.

न्यायालयीन प्रक्रिया बाबत जे सुरू आहे ते २८ तारखेला कळलेच,पण ज्या ठिकाणी ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण पोहचले आहे. त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. बाकी मात्र जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका वेळेत होतील असे वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com