Pune Robbery: पुणे–नाशिक महामार्गावर रंगला थरार! दरोडेखोरांचा गोळीबार, काय घडलं?

Pune-Nashik Highway Firing Petrol Pump Robbery: दोन लाख रुपयाची रोकड हस्तगत करून पळून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांचा अडीचशे मीटरपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकलवर बसण्याच्या घाईत एक आरोपी जमिनीवर कोसळला.
 Pune Robbery
Pune RobberySarkarnama
Published on
Updated on

मंचर (पुणे) : पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत अवसरी पेठ घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री गोळीबारांचा थरार रंगला. गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दरोडेखोरांनी दहशत माजवली.पंप चालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

तांबडे मळा गावाजवळ नरेंद्र धुमाळ यांच्या मालकीच्या ऋषी पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे पावणे दहाच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना मागे हटावे लागले. त्यानंतर चौघेही दरोडेखोर मोटारसायकलवर बसून नारायणगावच्या दिशेने पसार झाले.

मोटारसायकलवरून चार दरोडेखोर आले होते. पंपाचे व्यवस्थापक आकाश डोके यांच्या खोलीत दोन चोरटे आले. त्यांना पाहताच डोके यांनी आरडा ओरड केली. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या मदतीसाठी कॅशियर किसन पवार आले. यावेळी चोरट्यांबरोबर वादंग व झटापटी झाली. त्यावेळी चोरट्यांनी पिस्तूल रोखल्याने पवार व डोके घाबरून हतबल झाले.

चोरट्याने टेबलच्या ड्रायव्हर मधून दोन लाख रुपयाची रोकड हस्तगत करून पळून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांचा अडीचशे मीटरपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोटारसायकलवर बसण्याच्या घाईत एक आरोपी जमिनीवर कोसळला. कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे दुकानदार, स्थानिक नागरिक व रस्त्याने ये-जा करणारे वाहनचालक घटनास्थळी जमा झाले. काही वेळातच मोठी गर्दी पेट्रोल पंपावर झाली.

 Pune Robbery
India wins Asia Cup: तुमचे पत्र म्हणजे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’; याला ‘कात्रजचा घाट दाखवणं’ म्हणतात!

अवसरी घाट परिसरासह महामार्गावर तसेच रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली असली तरी आरोपी महामार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने पसार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज (शनिवारी) पहाटेपर्यंत परिसरात नाकेबंदी सुरू होती. अद्याप आरोपी हाती लागलेले नाही, पोलिस त्यांच्या मागावर आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्यामध्ये दरोडेखोरांचे चेहरे यात स्पष्ट दिसत आहेत. आरोपींचे वर्णन मिळाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com