Pune News : प्रजासत्ताक दिनी 189 कैदी तुरूंगातून होणार 'स्वतंत्र', कार्यवाहीला सुरूवात!

Prisoners will be freed from Prison : यासंदर्भात राज्य सरकारने आदेश पारित केले आहेत.
Pune Yerwada Jail
Pune Yerwada JailSarkarnama

पुणे : भारताचा प्रजासत्ताक दिवस काहीच दिवसांवर येऊ ठेपला आहे. यंदाचं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे, यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी १८९ कैद्यांच्या शिक्षेला विशेष माफी देऊन, त्यांना कारागृहातून सुटका करून त्यांना स्वातंत्र्य करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आदेश पारित केले आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त यंदाचं वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या, परंतु चांगली वर्तणूक आणि इतर निकषांनुसार पात्र कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यालयामार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार मागील १५ ऑगस्ट रोजी राज्यातील २०४ कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती.

Pune Yerwada Jail
Narendra Modi : मोदींच्या सत्कारावेळी शिंदे-फडणवीसांमध्ये रंगला 'पहले आप'चा खेळ; पाहा व्हिडिओ!

येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी १८९ कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. तसेच, यापुढे १५ ऑगस्ट २०२३ रोजी काही कैद्यांची सुटका करण्याचा प्रस्ताव आहे.

दरम्यान, गंभीर गुन्ह्यात दोषी असलेल्या कैद्यांची कारागृहातून सुटका करण्यात येणार नाही. कारागृहात शिस्त आणि चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका करून त्यांनी देशाचे जबाबदार नागरिक व्हावे, यासाठी ही संधी देण्यात येत आहे. कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Pune Yerwada Jail
Kasaba Peth Election : टिळक कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया ; 'पक्षाने संधी दिली तर...'

काय आहेत निकष -

- कैद्याची चांगली वर्तणूक आणि शिक्षेचा कालावधी ५० टक्के पूर्ण असणे अनिवार्य

- ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला आणि तृतीयपंथी कैदी

- ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पुरूष कैदी

- ७० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग कैदी

- गंभीर आजाराने त्रस्त कैदी

- गरिबीमुळे दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले कैदी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com