Pune News : पुण्याच्या उपनगरातील असुविधा पाहुन महापालिका आयुक्त प्रचंड संतप्त; जागेवर दोन सहाय्यक आयुक्तांना उचललं

Pune News: कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांमुळं शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिकेत स्थान मिळणार नाही, त्यांचं निलंबन केलं जाईल.
Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram
Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: वाघोलीत सोयीसुविधांचा आढावा घेताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना इथल्या नागरिकांनी घेराव घालत जाब विचारल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत आयुक्तांनी आज मोठा निर्णय घेतला. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी केली. तसंच आज (ता. १८) शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात पाहणी केली यात अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह, अतिक्रमण दिसल्याने हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांच्यासह दोन उप अभियंत्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर एका कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram
Kolhapur News: क्षीरसागरांचा सतेज पाटलांवर कडवा प्रहार! महायुती नेते व महापालिका अधिकाऱ्यांवरील टीका उत्तरच्या आमदारांच्या जिव्हारी

नव्यानं महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये प्राथमिक सुविधा जसे रस्ते, ड्रेनेज, कचरा यांच्या समस्या गंभीर असल्याचं आढळून आल्या आहेत. या भागातील नागरिकांशी संवाद साधताना वाघोलीत तर संतप्त झालेल्या नागरिकांनी आयुक्तांची गाडी अडवून त्यांना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला. शेवाळवाडी, मांजरीही प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी दिसून आली आहे. या भागात अस्वच्छता, रस्त्याने वाहणारे सांडपाणी, रस्त्यांना पडलेले खड्डे, गलिच्छ दुभाजक आणि पादचारी मार्ग, चौका-चौकातील अतिक्रमण, यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा निदर्शनास आले.

या सर्व समस्यांबाबत जेव्हा हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांना आयुक्तांनी विचारणा केली तर त्यांना याची समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळं आयुक्तांनी कडक भूमिका घेत ढवळे-पाटील यांना तातडीने या पदावरून हटवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम व्यवस्थित काम करत नसल्याने या तिघांचे थेट निलंबन केले आहे. यापुढे निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशी, निलंबन केले जाईल. तसेच त्यांची बदली ही अकार्यकारी पदावर केली जाणार आहे.

Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram
Kolhapur News: आता कागलमध्येही मतदारयाद्यांचा घोळ! CEO, BLO समरजीतसिंह घाटगेंच्या टार्गेटवर

दोन दिवसांपूर्वी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाघोली भागात झालेल्या पाहणी दरम्यानही आयुक्तांना रस्त्याने सांडपाणी वाहताना दिसले. तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. त्यावर निष्क्रियता दिसल्याने आयुक्तांनी सहय्यक आयुक्त शीतल वाकडे यांच्यासह मलनिःसारण विभागातील उप अभियंता विनायक शिंदे, गणेश पूरम यांचीही बदली केली आहे. या स्थितीबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं की, ‘‘शेवाळवाडी, मांजरी, वाघोली इथं कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांमुळं शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिकेत स्थान मिळणार नाही, त्यांचं निलंबन केलं जाईल. खात्यांतर्गत चौकशीनंतर त्यांची अकार्यकारी पदावर बदलीची कारवाई करण्यात येईल. कामातील निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही’’

Pune Municipal Commissioner Nawal Kishore Ram
Gujrat Pattern: गुजरातमधील राजकीय भूकंपाचे महाराष्ट्रात हादरे! स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्यांनी घेतलाय धसका

गलिच्छ सोलापूर मार्गाचं दर्शन

शेवाळवाडीकडं जाताना आयुक्तांना पुणे-सोलापूर महामार्गावरील दुभाजकांमधील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग दिसले. दुभाजकही घाण झाले होते, सोलापूर रस्त्याचे गलिच्छ दर्शन झाल्यानं आयुक्तांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संबंधित विभागांना तत्काळ या ठिकाणी स्वच्छता करण्याचे देश दिले आहेत. शहरातील अस्वच्छता, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि अतिक्रमणाच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकारी प्रभावीपणे काम करत नसतील, तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com