Pune News : विधानसभेत 'कोयता गँग'चा प्रश्न उपस्थित होताच, हडपसरमध्ये पोलिसांचा 'रूट मार्च'!

Pune News : कोयता गॅंग व्यापाऱ्यांना लुटत असून, यामुळे अनेक नागरिक भयभीत झाले आहेत.
Pune Police
Pune PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune News : हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील मांजरी येथे कोयता गँगने (Koyta Gang) दहशत पसरवली होती.याबाबत स्थानिक नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निवेदनाद्वारे तक्रार केली होती. कोयता गँगचा प्रश्न आता थेट राज्याच्या विधानभवनात उपस्थित झाला आहे. कोयता गँगवर मोक्का लावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आजच्या अधिवेशनात केली होती. याची दखल आता पोलिस प्रशासनाने घेतली आहे.

ज्या परिसरात कोयता गँगने दहशत पसरवली होती, त्या हडपसर भागात पोलिसांकडून "रुट मार्च" काढण्यात आला. दहशत पसरवणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृतीला जरब बसावी, या हेतून पोलिसांनी रूट मार्चचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगमुळे अनेक जणांना त्रास होत होता. या विरोधात मांजरी भागात स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता. कोयता गॅंग व्यापाऱ्यांना लुटत असून, यामुळे अनेक नागरिक भयभीत झाले आहेत, अशी तक्रार हडपसर आणि मांजरी भागातील स्थानिकांनी केली होती.

Pune Police
Grampanchayat Result : दानवे म्हणतात, जिल्ह्यात उद्धवसेनेचाच भगवा ; शिंदे गटाचाही नंबर वनचा दावा..

पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची नियुक्ती झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात अशा प्रकारचा "रूट मार्च" काढण्यात आला आहे. हा प्रश्न विधानसभेतउपस्थित झाल्याने यावर आता तातडीने दखल घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या कोयता गँग विरोधात कारवाई करा, अशी मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला मात्र अशी कुठलीही गॅंग हडपसर भागात सक्रिय असणार नाही, अशी ग्वाही हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली होती

Pune Police
विधानसभेनंतर ग्रामपंचायतीत शशिकांत शिंदेंना धक्का; महेश शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com