Ajit Pawar: शरद पवारांच्या आमदाराने भेट घेतल्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'तुम्ही वेडे आहात...'

Sandeep Kshirsagar Met Ajit Pawar:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड मधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Sandeep Kshirsagar Met Ajit Pawar
Sandeep Kshirsagar Met Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप शिरसागर यांनी सातत्याने हा विषय लावून धरला होता.

या दोन्ही नेत्यांकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. अशातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची दोनदा गुप्त भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सुरेश धस हे धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मॅनेज झाले असल्याची टीका सातत्याने विरोधकांतून होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड मधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी या भेटीचा तपशील माध्यमांपुढे सांगितला आहे.

Sandeep Kshirsagar Met Ajit Pawar
Freebies: 'रेवडी राजकारणा' ची सुप्रीम कोर्टाला चिंता; कुठल्या राज्यात सर्वात जास्त 'रेवड्या' वाटल्या जातात?

या भेटीबाबत विचारला अजित पवार संतापून म्हणाले, तुम्ही वेडे आहात, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि बीडचा पालकमंत्री देखील आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर हे जरी विरोधी पक्षातील आमदार असले तरी ते मला भेटू शकतात. त्यांच्या शहरांमध्ये गेले 21 दिवस पिण्यासाठी पाणी नाही. त्या संदर्भात काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती करण्यासाठी ते आले होते.

मी बीडचा पालकमंत्री असल्याने मला लोकप्रतिनिधी म्हणून संदीप क्षीरसागर भेटायला येत असतील तर त्यात काही वावगं नाही. पाण्याच्या समस्येबाबत तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याने त्यांनी माझी जुन्नर येथे येऊन भेट घेतली. जेवत असताना या पाणी प्रश्नावर आम्ही चर्चा केली आणि तातडीने त्याबाबत फोन करून पुढील सूचना दिले आहेत, असे अजित पवार म्हणाले.

संदीप क्षीरसागर म्हणाले, "अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. आमच्या बीड शहराचा पाणी प्रश्न हा अतिशय गंभीर बनला आहे. शहराची तीन लाख लोकसंख्या आहे. त्याला पाणी पुरवण्यासाठी नवीन पाणी योजना देखील राबवण्यात आली आहे. मात्र एमएससीबीची वीज बिल थकल्याने हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. याबाबत अजित पवार यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या असून यावर त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com